शेतकऱ्यांना उद्या मिळणार PM Kisan चा हफ्ता ! महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ ? नमोच्या हफ्त्याबाबत काय आहेत डिटेल्स

Published on -

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता उद्या अखेर कार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. पी एम किसान योजना ही केंद्रातील सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजाराचा हप्ता म्हणजेच एका वर्षात तीन हप्ते दिले जातात आणि आत्तापर्यंत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 20 हप्ते मिळाले आहेत तर काही राज्यांमधील शेतकऱ्यांना 21 हप्ते मिळाले आहेत.

पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमधील शेतकऱ्यांना 21 वा हप्ता आधीच मिळाला आहे आणि उद्या राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार अशी माहिती कृषी विभागाकडून नुकतीच प्राप्त झाली आहे.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेचा देशभरातील करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळतो पण राज्यातील किती शेतकऱ्यांना या योजनेचा 21 वा हप्ता मिळणार या संदर्भात आता आपण माहिती जाणून घेऊयात. 

राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ? 

 मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 97 लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी 90 लाख 41 हजार शेतकरी या हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत. योजनेच्या नियमानुसार फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंदलेली आहे, ते या योजनेसाठी पात्र मानले जातात.

याच नियमानुसार राज्यातील 90 लाख 41 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा 21 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील 4,90,566 शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान नमोच्या हफ्ताबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 

कधी मिळणार नमोचा हफ्ता?

केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासन ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ ही स्वतंत्र योजना राबवत आहे. नमो शेतकरी योजना हे राज्य शासनाची योजना असून याचा सर्व भार राज्य शासन ऊचलते.

या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना सुद्धा वार्षिक 6,000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेतून सुद्धा 2,000 रुपयांचा हफ्ता मिळतो. दर चार महिन्यांनी हा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

उद्या केंद्राचा हप्ता येईल आणि त्यानंतर काही दिवसांनी राज्याचा हप्ता मिळणार आहे. राज्य सरकारचा म्हणजेच नमो शेतकरीचा हप्ता महिनाअखेरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News