Post Office Scheme : तुम्हालाही सुरक्षित बचत योजनांमध्ये पैसा गुंतवायचा आहे का मग तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर 2025 हे वर्ष FD करणाऱ्यांसाठी विशेष खास राहिलेले नाही. या वर्षात आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे यामुळे फिक्स डिपॉझिट चे व्याजदर देखील प्रचंड कमी झाले आहेत.
देशातील सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडी चे व्याजदर कमी करण्यात आले आहेत आणि यामुळे एफ डी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय. पण, आजही सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या बचत योजनांचे व्याजदर जैसे थे आहेत.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर सुद्धा आजही कायम आहेत. अशा स्थितीत जर तुम्हाला पोस्टाच्या बजत योजना गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेची माहिती सांगणार आहे.
पोस्टाची टीडी योजना ही एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते.
कशी आहे पोस्टाची टीडी योजना
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 60 महिन्यांमध्ये दोन लाख रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. पोस्टाच्या एका वर्षाच्या पिढी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9% दराने व्याज दिले जाते.
दोन वर्षासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के दराने व्याज दिले जाते. तीन वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जाते आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50% दराने व्याज दिले जाते.
या योजनेत गुंतवणूकदारांना आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेला शासकीय हमी आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत करसवलतीचा सुद्धा लाभ दिला जात आहे.
नक्कीच जा गुंतवणूकदारांना टॅक्स सेविंग स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची राहणार आहे. अर्थात यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा मिळत असतो.
सुरक्षित परतावा आणि टॅक्स बचत अशा दुहेरी उद्देशासाठी या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते. यामध्ये किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा सेट करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदाराला जेवढी रक्कम गुंतवायची असेल तेवढी रक्कम तो यामध्ये गुंतवू शकतो.
दोन लाखांच्या व्याजासाठी किती गुंतवणूक करावी लागणार?
पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक पाच वर्षांसाठी म्हणजेच सात महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली तर 7.5% दराने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर













