Zodiac Sign : आजचा दिवस काही लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. आज पासून काही लोकांचे नशीब पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे. खरेतर, कलियुगात प्रामाणिकपणे जगणाऱ्यांनाही अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांकडून ऐकायला येतात.
ज्योतिषशास्त्रानुसार यामागील एक प्रमुख कारण म्हणजे ग्रह-ताऱ्यांची स्थिती. ज्योतिषशास्त्र असे सांगते की, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात.

19 नोव्हेंबर 2025 रोजी होणारे सूर्याचे अनुराधा नक्षत्रातील प्रवेश हे अशाच महत्त्वाच्या खगोलीय बदलांपैकी एक मानले जात आहे. बुधवार, रात्री 9:03 वाजता सूर्य विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल.
शनीच्या अधिपत्याखाली येणारे हे नक्षत्र सामान्यतः सूर्याशी प्रतिकूल मानले जाते, परंतु या वेळचे भ्रमण काही राशींसाठी शुभदायक ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, वृश्चिक आणि धनू या तीन राशींवर या नक्षत्रांतर्गत सूर्यप्रवेशाचा विशेष अनुकूल परिणाम होणार आहे. दरम्यान आता आपण या घटनेचा राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल याबाबत माहिती पाहणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
मेष राशी
या काळात मेष राशीच्या व्यक्तींना दीर्घकाळ अडकलेली कामे पुन्हा वेग धरतील. करिअरमध्ये मान-सन्मान वाढेल तसेच वरिष्ठांकडून समर्थन मिळेल.
कौटुंबिक वातावरण आनंदी होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुलांकडून आनंददायी बातम्या मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ संतुलित राहील.
वृश्चिक राशी
स्वतःच्या राशीत सूर्याचे भ्रमण सुरू असल्याने वृश्चिक राशीवर सकारात्मक उर्जेचा प्रभाव दिसून येईल. व्यवसायात प्रगती, नवीन जबाबदाऱ्या आणि मान-सन्मानाची प्राप्ती होऊ शकते. जुनी प्रकल्पे पूर्णत्वास जातील. कुटुंबीयांमध्ये समंजसपणा वाढेल, मात्र आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.
धनु राशी
धनु राशींसाठी हा काळ संधींचा वर्षाव करणारा ठरेल. नवीन प्रकल्प, शिक्षण व गुंतवणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग निर्माण होतील, ज्यातून आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ संभवतात. मित्र व सहकाऱ्यांकडून मजबूत सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुन्या तणावांनाही निराकरण मिळू शकते.













