Best Tourist Spot : तुम्ही पण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेतरी पिकनिकला जाण्याचा प्लान बनवतायेत का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. ही बातमी मुंबईकरांसाठी अधिक खास ठरू शकते कारण की आज आपण मुंबई जवळील अशा एका लोकेशन ची माहिती पाहणार आहोत जिथे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आवर्जून भेट दिली जाते.
हिवाळी पर्यटनासाठी अनेकांचे हे हॉट फेवरेट डेस्टिनेशन सुद्धा आहे. त्यामुळे जर तुम्हाला या वीकेंडला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर तुम्ही हे डेस्टिनेशन नक्कीच एक्सप्लोर करायला हवं. आम्ही ज्या लोकेशन बाबत बोलत आहोत ते आहे केळवा बीच.

हे ठिकाण पालघर मध्येच आहे. मुंबईच्या अगदीच जवळ असल्याने अनेक मुंबईकर येथे विकेंडला गर्दी करतात. विकेंडला फिरायला जायचं असेल तर मुंबईकरांसाठी हा नक्कीच एक बेस्ट पर्याय राहणार आहे.
येथील बीचवर असणारी मऊ आणि सोनेरी वाळू तसेच शांत आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेते. येथे गेल्यावर तुम्हाला शहरातील गोंगाटापासून नक्कीच सुटका मिळणार आहे. केळवा हा सुरू वृक्षांनी वेढलेला समुद्रकिनारा आहे.
यामुळे हिवाळ्यात येथे फारच सुंदर आणि अगदीच मनमोहक असे दृश्य पाहायला मिळते. येथील हिरवेगार दृश्य पर्यटकांना भुरळ पाडणारेच आहे. येथे तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
येथे वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी असते यामुळे तुम्हीही येथे नक्कीच तुमचा वीकेंड सेलिब्रेट करू शकता. केळवा बीच जवळ तुम्हाला केळवा किल्ला आणि श्री शीतला माता देवीचे मंदिर सुद्धा पाहायला मिळणार आहे.
हे लोकेशन फोटोशूट साठी देखील फारच प्रसिद्ध आहे. इथे अनेक जण फोटोशूट करण्यासाठी येतात. प्री-वेडिंग करण्यासाठी देखील येथे जोडप्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
येथे तुम्हाला कॅम्पिंगचा सुद्धा आनंद घेता येणार आहे म्हणून तुम्हाला जर कॅम्पिंग ला जायचं असेल तरी तुम्ही येथे नक्कीच व्हिजिट करायला हवी.
तुम्ही जर ट्रेनने इथं जाणार असाल तर पालघर स्टेशनला उतरा, इथे उतरल्यानंतर तुम्हाला केळवा बीचला जाण्यासाठी रिक्षा घ्यावी लागेल.













