रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असणाऱ्या ‘या’ बँकेच्या शेअर्समध्ये तुफान तेजी ! शेअर्स आणखी इतके वाढणार

Published on -

Rekha Jhunjhunwala Stock : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत जर तुम्ही पण शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करत असाल तर नक्कीच ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.

बिगबुल दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असणाऱ्या एका बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यात तुफान तेजी दिसून आली आहे आणि येत्या काळात सुद्धा हा स्टॉक तेजित राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फेडरल बँकेत रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे आणि हाच Federal Bank चा शेअर मंगळवारी बीएसईवर तेजीत राहिला. 18 नोव्हेंबर रोजी फेडरल बँकेचे शेअर्स तीन टक्क्यांनी वधारलेत.

काल हा स्टॉकं 246.55 रुपयांवर म्हणजे 52 आठवड्याच्या हाय वर पोहचलेत. मागील दोन महिन्यांत या प्रायव्हेट बँकेच्या शेअरमध्ये 24 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून गुंतवणूकदारांच्या नफ्यात मोठी भर पडली आहे.

याच कालावधीत फेडरल बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांचा लो अर्थात 172.95 वर होते. म्हणजेच शेअरने गेल्या काही महिन्यांमध्ये जबरदस्त कम बॅक करत आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे.

दरम्यान आता शेअर मार्केट विश्लेषक सुद्धा फेडरल बँकेच्या वाढीच्या क्षमतेबाबत सकारात्मक आहेत. फोर्ट कॅपिटलचे सिनियर फंड मॅनेजर पराग ठक्कर यांनीही शेअरबद्दल बुलिश दृष्टिकोन ठेवला आहे.

त्यांच्या मते, फेडरल बँकेची कामगिरी, कर्जवाटपातील वाढ आणि अलीकडील धोरणात्मक गुंतवणूक या कारणांमुळे शेअर्स पुढील वर्षभरात तीनशे रुपये किंवा 320 रुपये पर्यंत पोहोचू शकतो.

नक्कीच या शेअरची किंमत 320 रुपयांपर्यंत पोहोचली तर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. ब्लॅकस्टोन (Blackstone) या जागतिक प्रायव्हेट इक्विटी दिग्गज कंपनीने अलीकडेच फेडरल बँकेत सुमारे 705 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

या गुंतवणुकीनंतर ब्लॅकस्टोन बँकेतील 9.9 टक्के हिस्सा मिळवणार असून ती फेडरल बँकेची सर्वात मोठी भागधारक बनेल. या मोठ्या गुंतवणुकीमुळे बँकेवर बाजाराचा विश्वास दृढ होत असून तिचे बाजार भांडवलही मंगळवारी 60500 कोटींच्या वर गेले आहे.

दरम्यान, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील फेडरल बँकेत आपला हिस्सा वाढवला आहे. सप्टेंबर 2025 च्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार, त्यांच्याकडे 5 कोटी 90 लाख तीस हजार 60 शेअर्स आहेत. हे शेअर्स एकूण 2.42% हिस्स्याइतके आहे. जून 2025 मध्ये त्यांचा हिस्सा फक्त एक पॉईंट 48% होता.

म्हणजे त्यांनी सप्टेंबर तिमाहीत मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. आता फेडरल बँकेवरील वाढता बाजाराचा विश्वास, मजबूत आकडेवारी आणि मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांचा पाठिंबा पाहता शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News