DA Hike News : केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आणि त्यानंतर तीन नोव्हेंबर 2025 रोजी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी दिली. या दिवशी आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली.
आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली. दरम्यान तेव्हापासून नव्या आठव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि आता पुन्हा एकदा या आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे.

18 महिन्यांनी कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी
मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या समितीला शिफारशी सादर करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. अर्थात पुढील 18 महिन्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या समितीला आपल्या शिफारशी सरकारकडे सुपूर्द करायच्या आहेत.
सरकारकडे शिफारशी जमा झाल्यानंतर सरकार त्यावर अधिकृत निर्णय घेणार आहे. एप्रिल 2027 पर्यंत या शिफारशी सरकारकडे जमा होतील आणि त्यानंतर 2027खेरपर्यंत नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
मात्र आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू राहील. म्हणजे पात्र कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ दिला जाणार आहे.
पण आता अनेकांच्या माध्यमातूनच असावा उपस्थित केला जातोय की दर सहा महिन्यांनी जी महागाई भत्ता वाढ लागू केली जाते ती महागाई भत्ता वाढ सातव्या वेतन आयोगात लागू होणार की आठव्या वेतन आयोगात.
कारण की सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की आठव्या वेतन आयोग लागू होण्याआधी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
किती वेळा वाढणार महागाई भत्ता
जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत सातवा वेतन आयोग अंतर्गत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ भेटत राहणार आहे. तसेच जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांना थकबाकीचा लाभ दिला जाणार आहे.
मग आता आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना किती वेळा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार? खरे तर दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो यानुसार 18 महिन्यांच्या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन वेळा वाढेल.
अर्थात आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना तीनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळतोय आणि जर समजा पुढील तीन वेळा महागाई भत्ता प्रत्येक वेळी तीन टक्क्यांनी वाढला तर हा महागाई भत्ता 67% पर्यंत पोहोचणार आहे.













