Maharashtra Rain : सध्या राज्यात सगळीकडे गुलाबी थंडी पडत आहे. धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सहित उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाडे गोठवणारी थंडीचा अनुभव नागरिकांना येतोय. या बोचरी थंडीमुळे सगळीकडे कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थोडेसे ढगाळ वाहमान होते आणि यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे पण तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान कमीच राहिले. दरम्यान आज पासून राज्यातील हवामानात एक मोठा चेंज पाहायला मिळू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आज पासून वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या भागात पुढील दोन-तीन दिवस वादळी पाऊस राहणार असा अंदाज आयएमडी कडून नुकताच वर्तवण्यात आला आहे.
किती दिवस राहणार पाऊस
भारतीय हवामान खात्याने ऐन हिवाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग पुन्हा एकदा पावसाने व्यापला जाणार आहे.
22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यानच्या तीन दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा पाऊस होणार आहे. कोकणातील दक्षिणेकडील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हे पुन्हा पावसाने व्यापले जाणार आहेत.
कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला असून आज आपण 22 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती राहणार याचा आढावा घेणार आहोत.
कस असणार 22 नोव्हेंबरच हवामान?
मुंबई शहर आणि उपनगरात मुंबईतील कमाल तापमान 33° सेल्सिअस आणि किमान तापमान 21°c राहू शकते. त्याचवेळी कोकणातील दक्षिणेकडील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे.
याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे पण हलका पाऊस पडू शकतो. त्याचवेळी पुणे आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे आज कोरडे राहणार आहेत.
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात जी कडाक्याची थंडी पडत होती त्यात थोडीशी घट येऊ शकते. येथील थंडीची तीव्रता आज कमी होणार असा अंदाज आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील थंडीवर परिणाम होणार आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात सुद्धा थंडीची तीव्रता कमी होणार आहे.
विदर्भात तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. पण या भागात कुठेच पाऊस पडणार नाही. येथील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.













