Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांपूर्वी अर्थात 20 नोव्हेंबर 2025 रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी झाले आहेत.
हे GR वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जारी झाले आहेत आणि आज आपण हेच तीनही शासन निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या निर्णयांचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? हे आता आपण समजून घेऊयात.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी झालेले 3 महत्वाचे निर्णय !
वेतन अनुदान वितरित करण्याबाबतचा जीआर : शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण GR जारी झाला आहे. ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या वेतनाबाबत विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागात कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे वेतन देयक करीता अनुदान निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील GR जारी केला आहे. सदरचा निधी हा नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यास व वितरीत करण्यास या GR च्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे.
थकीत वेतन अदा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जीआर : राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आता खात्यात जमा होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत येणाऱ्या विशेष शिक्षकांचे वेतन थकीत होते.
दरम्यान हे थकित वेतन लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशी मागणी होत होती. या अनुषंगाने आता थकीत वेतन अदा करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा GR : शिक्षण विभागासोबतच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देखील 20 नोव्हेंबरला एक महत्त्वाचा जीआर जारी केला आहे.
या शासन निर्णयाच्या माध्यमातून क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई ( गट ड ) संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्ती करीता पुनर्जित करणेबाबत मंजुरी देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.













