Gratuity New Rules : संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अलीकडेच केंद्रातील सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये काही अगदीच महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कामगार कायद्यात झालेला हा बदल कालपासून लागू झाला आहे.
21 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेल्या चार नवीन कामगार कोडद्वारे काही महत्वाचे नियम बदलले गेले आहेत. या सुधारणांमुळे कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. Payment of Gratuity Act, 1972 मध्ये पण सरकारने सुधारणा केली आहे.

“ग्रेच्युटी” मिळण्यासाठी आधी पाच वर्ष काम करण्याची अट होती पण आता ही अट एक वर्ष करण्यात आली आहे. म्हणजे आता कमी कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे आणि यामुळेच शासनाच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.
या निर्णयाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याचा फायदा फक्त कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाच मिळणार नाही, तर फिक्स टर्म कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कामगार, प्लॅटफॉर्म वर्कर, गिग वर्कर्स व महिला कामगारांना सुद्धा याचा फायदा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या कर्मचाऱ्यांना आता एक वर्ष काम पूर्ण केले तरी नोकरी सोडताना ग्रॅच्युटीचा लाभ दिला जाणार आहे. ग्रॅच्युईटी ही कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या आणि निष्ठावान कार्याचा सन्मान आहे. कंपनीला दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात कंपनीकडून दिली जाणारी ही एक बक्षीसची रक्कम आहे.
कर्मचाऱ्यांना नोकरी सोडताना किंवा निवृत्तीच्या वेळी ग्रॅच्युईटीचा लाभ मिळतो. दरम्यान, आता सरकारने केलेल्या या सुधारणांमुळे 50 हजार रुपये मासिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला आता किती ग्रॅच्युटी मिळणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
किती मिळणार Gratuity ?
आता आपण पन्नास हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला जुन्या नियमानुसार किती ग्रॅच्युईटी मिळायची आणि नव्या नियमानुसार किती ग्रॅज्युएटी मिळणार याच गणित समजून घेणार आहोत.
नव्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीचा शेवटचा पगार ( यामध्ये मूळ पगार आणि महागाई भत्ता ) 50 हजार रुपये असेल आणि त्याने एक वर्ष नोकरी केली असेल तर त्याला 28,847 रुपये ग्रॅच्युईटी मिळणार आहे.
त्याचवेळी जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षे काम केले असेल आणि त्याचा शेवटचा पगार 60,000 असेल तर त्याला पाच वर्षानंतर एक लाख 73 हजार 77 रुपये Gratuity मिळणार आहे. ग्रॅच्युईटीचा फॉर्मुला = 60,000 × (15/26)×5 = एक लाख 73 हजार 77 रुपये Gratuity मिळणार आहे.













