DMart Shopping Hack : डी मार्ट ला जाताय का ? अहो मग डीमार्टच्या पायऱ्या चढण्याआधी आजची ही बातमी तुम्ही नक्कीच वाचायला हवी. खरेतर, मध्यमवर्गीयांचा स्वभाव हा नेहमीच बचतीचा राहतो. यामुळे शॉपिंग करताना देखील बचतीला मध्यमवर्गीय नेहमीच पसंती दाखवतात.
हेच कारण आहे की महिन्याचा किराणा भरण्यासाठी बारा महिने डिस्काउंट दिल्या जाणाऱ्या सुपर मार्केटमध्ये अर्थात डी मार्ट मध्ये मध्यमवर्गांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या डीमार्टमध्ये दररोज मोठी खरेदी होत असते.

डी मार्ट हे असे एक लोकप्रिय सुपर मार्केट आहे ज्यामध्ये सर्वसामान्यांना किराणा सामान, कपडे, घरगुती वस्तूंपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत अनेक गोष्टी MRP पेक्षा कमी दरात उपलब्ध होतात. साहजिकच यामुळे डीमार्ट ही शॉपिंगसाठी पहिली पसंती ठरते.
पण, येथे जास्तीत जास्त बचत करायची असेल तर कोणत्या दिवशी खरेदी करावी? असा सवाल अनेक जण उपस्थित करतात. रविवार सोमवार की गुरुवार कोणत्या दिवशी डी मार्ट मध्ये शॉपिंग केली पाहिजे जेणेकरून आमचे पैसे अधिक सेव होतील असा अनेकांचा प्रश्न असतो.
दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. डी मार्ट मध्ये शॉपिंग करणाऱ्यांसाठी आज आपण काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे त्यांचे आणखी काही पैसे बचत होणार आहेत. खरेतर डीमार्टमध्ये दररोज काही ना काही वस्तूंवर सवलती असतात.
किंमती आठवड्यात बदलू शकतात, पण सर्व वस्तूंवर सूट कधी मिळेल याचे निश्चित वेळापत्रक नसते. तरीही, आठवड्याच्या विशिष्ट दिवशी आणि सणांच्या काळात खरेदी केल्यास ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बचत करता येते.
सर्वात जास्त गर्दी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दिसते. याच काळात अनेक वस्तूंवर जसे की, किराणा, कपडे आणि स्किन केअर उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या जातात.
स्टोअरमध्ये ‘Buy One Get One Free’ सारख्या ऑफर्सही याच कालावधीत जास्त प्रमाणात दिसतात. जेव्हा ग्राहकांची प्रचंड गर्दी असते अशा कालावधीत डी मार्ट मोठं-मोठ्या ऑफर्स लावते. सणासुदीच्या काळात डीमार्टमध्ये खरेदीचा अनुभव अजून आकर्षक बनतो.
दिवाळी, दसरा, होळी, ख्रिसमस आणि नवीन वर्ष या काळात कपडे, सजावटीच्या वस्तू, गिफ्ट सेट, चॉकलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सवरही खास सवलती दिल्या जातात. त्यामुळे अनेक ग्राहक याच काळात मोठी खरेदी आटोपतात.
काही शहरातील डीमार्ट स्टोर्समध्ये रविवारनंतर शिल्लक राहिलेल्या स्टॉकचा क्लिअरन्स सेल लावला जातो. या सेलबाबत पूर्वसूचना नसली तरी स्थानिक पातळीवर ग्राहकांना निवडक वस्तूंवर अतिरिक्त सूट मिळते. या सेलचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांनी सकाळी स्टोअर भेट देणे अधिक फायदेशीर ठरते.
ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठीही डीमार्ट रेडी ॲपमध्ये खास ऑफर्स असतात. सोमवार आणि बुधवार या दिवशी काही खास ऑनलाइन डील्स व कूपन देण्यात येतात. मात्र या ऑफर्स फक्त ॲपद्वारे ऑर्डर केल्यासच लागू होतात.













