Maharashtra IT Park News : पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून जगात प्रसिद्ध आहे. पुण्यातील आयटी पार्क भारतातील दुसरे मोठे IT Park आहे. दरम्यान आता भारतातील तिसरे मोठे आयटी पार्क सुद्धा आपल्या महाराष्ट्रात उभारले जाणार आहे.
आता राज्यात पुण्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आणखी एक मोठे केंद्र निर्माण होणार आहे. राज्यातील दुसरे सर्वात मोठे अन देशातील तिसरे मोठे आयटी पार्क आता महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात उभारले जाणार आहे.

राज्य सरकारने सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पाची घोषणा नुकत्याच काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती.
दरम्यान आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या सर्वात मोठ्या आयटी पार्क साठी जागा फायनल करण्यात आली असून प्रशासनाने जमिनीची पाहणी, तांत्रिक सर्वेक्षण आणि विभागीय मान्यतांची प्रक्रिया मोठ्या वेगाने पूर्ण सुद्धा केली आहे.
कुठे उभारल जाणार आयटी पार्क
सोलापुरातील जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागेवर हे आयटी पार्क विकसित केले जाणार आहे. शहरातील सुमारे 50 एकर जागा आयटी पार्कसाठी अंतिम करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की निश्चित करण्यात आलेली ही जागा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) सुपूर्द देखील करण्यात आली आहे. या जागेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही जागा विमानतळाच्या जवळ आहे. त्यामुळे येथे होऊ घातलेल्या आयटी पार्कच्या विकासासाठी ही एक मोठी बाब सिद्ध होणार आहे.
पण होटगी रोड परिसरातील ही जागा विमानतळाच्या जवळ असल्याने इमारतींच्या उंचीवर निर्बंध येऊ शकतात. विमानतळ प्रशासनाकडून या आयटी पार्क मध्ये फक्त 50 मीटर पर्यंतच्या इमारतींसाठी औपचारिक परवानगी देण्यात आली आहे.
म्हणजे या आयटी पार्क मध्ये ज्या इमारती तयार केल्या जातील त्या 50 मीटर पर्यंत उंच राहतील. दरम्यान विमानतळ प्रशासनाकडून औपचारिक परवानगी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
18 महिन्यांमध्ये काम पूर्ण केले जाणार
हा प्रकल्प फास्टट्रॅकवर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. हा आयटी पार्क चा प्रकल्प फडणवीस सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे राज्य सरकारने या आयटी पार्कसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांसाठी जवळपास 38 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सुद्धा सादर केला आहे.
या निधीमधून अंतर्गत रस्ते, जलपुरवठा, पथदिवे, वीजपुरवठा आणि इतर आवश्यक सोयी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याचे काम पुढील 18 महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
45 हजार रोजगारांची निर्मिती
सोलापुरातील प्रस्तावित आयटी पार्क महाराष्ट्रातील दुसरेच मोठे आयटी पार्क राहणार आहे यामुळे येथे हजारो नोकऱ्या तयार होतील. मिळालेल्या माहितीनुसार हे आयटी पार्क विकसित झाल्यानंतर या ठिकाणी 45 हजार लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
तसेच अनेक स्वयंरोजगार सुद्धा तयार होणार आहेत. यामुळे एकूणच सोलापूर शहराच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. हे आयटी पार्क महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगाना या तीनही राज्यांमधील कंपन्यांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.













