‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल, 28 रुपयांच्या शेअर्सने फक्त 5 वर्षात दिले 56,000 % रिटर्न

Published on -

Multibagger Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

येथे केलेली गुंतवणूक आव्हानात्मक अन जोखीमपूर्ण असते मात्र तरीही अनेक जण येथे गुंतवणूक करतात आणि योग्य अभ्यास करून चांगले रिटर्न सुद्धा मिळवतात. शेअर मार्केट गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये जबरदस्त रिटर्न मिळत आहेत.

इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजचा शेअर याचेच एक उत्तम उदाहरण आहे. खरे तर या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांच्या काळात 56 हजार टक्के रिटर्न दिले आहेत. दरम्यान आता आपण या स्टॉकची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेअरची मागील 5 वर्षाची कामगिरी कशी राहिली?

सद्यस्थितीला या कंपनीचा स्टॉक 28 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. गत पाच दिवसांमध्ये या कंपनीचे स्टॉक तुफान तेजीत आहेत. गेल्या पाच वर्षांचा विचार केला असता या कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तब्बल 56 हजार टक्के रिटर्न मिळाले आहेत.

मात्र या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्म मध्ये समिश्र रिटर्न मिळाले आहेत. मागील एका वर्षाच्या काळात या स्टॉक मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

स्टॉक एक्सचेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार मागील बारा महिन्यांमध्ये या कंपनीचे स्टॉक 30 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांमध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली आहे तसेच गेल्या तीन महिन्यांमध्ये कंपनीचे स्टॉक 41 टक्क्यांनी वाढले आहेत.

तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मागील 30 दिवसांच्या काळात 13 टक्क्यांचे रिटर्न मिळाले आहेत. दरम्यान शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी या स्टॉक मध्ये तेजी दिसून आली आहे.

कंपनीने अलीकडेच फंड उभारण्याची घोषणा केली होती, दरम्यान या घोषणेनंतर कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत आणि याच्या किमती सतत वाढत आहेत.

28 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होणार आहे आणि यामध्ये फंड उभारणीवर अंतिम निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब अशी की कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल सुद्धा चांगले राहिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News