शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! पुढील आठवड्यात ‘या’ 5 कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना देणार लाभांश

Published on -

Share Market News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मार्केटमधील पाच बड्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना येत्या आठवड्यात लाभांश देणार आहेत. खरंतर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स आणि लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा ठेवतात.

दरम्यान जर तुम्हाला ही शेअर मार्केट मधून कमाई करायची असेल आणि तुम्हीही बोनस शेअर्स किंवा लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या टॉप पाच कंपन्या पुढील आठवड्यात आपल्या शेअर होल्डर्स ला लाभांश देणार आहेत. दरम्यान आज आपण पुढील आठवड्यात कोणत्या कंपन्या आपल्या शेअर होल्डर्स ला लाभांश देणार याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ही कंपनी देणार 55 रुपयांचा लाभांश

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा कमाईची संधी घेऊन येत आहे. येत्या आठवड्यात मार्केटमधील पाच बड्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश जारी करणार आहेत.

खरे तर सोमवारपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात एकूण पाच कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, इंगरसोल-रँड (इंडिया) आपल्या गुंतवणूकदारांना 55 रुपयांचा लाभांश देणार आहे.

या कंपनीने प्रति शेअर 55 रुपयांचा अंतरीम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने 25 नोव्हेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीचे रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या लाभांशाचा लाभ देण्यात येणार आहे.

तसेच, एके कॅपिटल सर्व्हिसेसने देखील 16 रुपयांचा अंतरीम लाभांश देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 16 रुपयांचा लाभांश देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट कंपनीकडून 27 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

अर्थात या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे. Power Finance Corporation Ltd सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना चार रुपयांचा लाभांश देणार आहे.

यासाठी कंपनीने 26 नोव्हेंबर 2025 रेकॉर्ड तारीख फायनल केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. Nile Ltd कंपनीने देखील आपल्या शेअर होल्डर साठी लाभांश वितरित करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना पाच रुपयांचा लाभांश देणार आहे आणि यासाठी कंपनीने 28 नोव्हेंबर 2025 ही तारिख रेकॉर्ड तारीख म्हणून सेट केली आहे.

Meera Industries Ltd ने सुद्धा 0.5 रुपयांचा लाभांश जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीकडून  28 नोव्हेंबर 2025 ही तारीख रेकॉर्ड तारीख म्हणून फायनल करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News