Solar Panel Subsidy : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाढत्या वीज बिलामुळे अडचणीत आली आहे. अलीकडे विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. विजेचा वापर आणि विजेचे दर दोन्हीही वाढत आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांना वीजबिलासाठी मोठा खर्च करावा लागतोय.
दरम्यान जर तुम्हीही वाढत्या वीज बिलामुळे परेशान असाल आणि वाढत्या वीजबिलाला आळा घालायचा असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरेतर वाढते विज बिल कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहनासाठी राज्य शासनाने रूफटॉप सोलर बसवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन विशेष योजना राबवत आहे.
पीएम सूर्यघर मोफत वीज योजना ही केंद्राची आणि राज्याची ‘i-SMART’ नावाने सुरू झालेल्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत घरच्या छतावर सोलर सिस्टम बसवण्यासाठी ग्राहकांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
या केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना आता केवळ 2,500 रुपये नाममात्र रक्कम भरून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवता येणार आहे. दरम्यान, उर्वरित संपूर्ण खर्च सरकारकडून अनुदानातून कव्हर केला जाणार आहे.
कुणाला मिळेल या योजनेचा लाभ ?
‘i-SMART’ रूफटॉप सोलर योजना 2025 मुख्यत्वे राज्यातील सामान्य वीज ग्राहकांसाठी सुरु करण्यात आली आहे. ज्यांचा वापर १०० युनिटपेक्षा कमी आहे, दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबे, कमी वीज वापर करणारे घरगुती ग्राहक यांना यांचा लाभ मिळतो.
या योजनेत लाभार्थ्यांना मोठे अनुदान दिले जात आहे. या योजनेतून वीज ग्राहकांना जास्तीत जास्त ९५% पर्यंत अनुदान मिळते. तसेच यातून काही ग्राहकांना ९०% मिळते.
तसेच ओपन व ओबीसी कॅटेगिरी मधील वीज ग्राहकांना (Open/OBC) ८०% पर्यंत अनुदान मिळणार आहे. यामुळे फक्त २,५०० रुपये भरून ग्राहकांना सोलर सिस्टम बसवण्याची मोठी संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. अर्थातच आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता दोन स्वतंत्र पोर्टलची गरज उरलेली नाही.
केंद्र सरकारचे PM सूर्य घर योजना आणि राज्याचे i-SMART पोर्टल यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून एका पोर्टलवर केलेला अर्ज दोन्हीकडे स्वीकारला जाईल. आता आपण याच्या अर्ज प्रक्रिये बाबत माहिती पाहुयात.
महाडिस्कॉम पोर्टलवर अर्ज कसा कराल ?
सगळ्यात आधी महाडिस्कॉम वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. तिथे ‘Apply for Rooftop Solar’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. नंतर ग्राहक क्रमांक टाका. मग ‘Apply’ निवडा आणि तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा. मग मोबाईल OTP ने पडताळणी करा.
मग नोंदणीकृत मोबाईलवर येणारा OTP टाकून व्हेरिफिकेशन करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर नाव, पत्ता, बिलिंग युनिट इत्यादी तपशील आपोआप दिसतात. यानंतर तुम्हाला आधार व PAN माहिती भरायची आहे. आधार क्रमांक टाकून OTP पडताळणी करा आणि PAN माहिती अपडेट करायची आहे.













