Pune Vande Bharat News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून पुण्यातून धावणारी एक महत्त्वाची वंदे भारत एक्सप्रेस एका अतिरिक्त रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, 24 नोव्हेंबर 2025 पासून पुण्यातून धावणारी पुणे – हुबळी वंदे भारत एक्सप्रेस आता एका अतिरिक्त स्थानकावर थांबा घेणार आहे.

ही गाडी उद्यापासून किर्लोस्करवाडी या रेल्वेस्थानकावर थांबा घेणार असून यामुळे या रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
किर्लोस्करवाडी व आजूबाजूच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांना या निर्णयाचा सर्वाधिक लाभ होणार असून या प्रवाशांना पुण्याकडे आणि हुबळीकडे जाण्यासाठी एक चांगला अन सोपा विकल्प उपलब्ध होणार आहे.
पुणे – हुबळी सोबतच मुंबई – पुणे – सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसला देखील एक अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता दौंड या रेल्वेस्थानकावर सुद्धा थांबा घेणार असून या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा 24 नोव्हेंबर पासूनच होणार आहे.
अर्थातच उद्यापासून मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस दौंड स्थानकावर आणि पुणे – हुबळी वंदे भारत एक्सप्रेस किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा घेणार आहे.
या दोन्ही निर्णयामुळे सांगली, वाल्वा, इस्लामपूर आणि परिसरातील प्रवाशांना वंदे भारतची सेवा अधिक जवळून उपलब्ध होणार आहे. रेल्वे अभ्यासकांच्या मते, दौंड आणि किर्लोस्करवाडी येथे मिळालेल्या नव्या थांब्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप फारच कमी होणार आहे.
पुण्याहून हुबळीच्या दिशेने जाणारी वंदे भारत एक्सप्रेस 24 नोव्हेंबरपासून सायंकाळी पाच वाजून 43 मिनिटांनी किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा घेणार आहे.
तसेच हुबळीहून पुण्याकडे येणारी वंदे भारत एक्सप्रेस किर्लोस्करवाडी येथे सकाळी 9 वाजून 38 मिनिटांनी थांबा घेणार आहे.













