Post Office Scheme : गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. पण सध्याच्या काळात शेअर बाजारातील चढ-उतार, आर्थिक अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत.
शेअर मार्केट मधील अनिश्चितता आणि जोखमीचे गुंतवणूक पर्याय वाढत असताना आता सामान्य गुंतवणूकदार सुरक्षित व स्थिर परतावा देणाऱ्या सरकारी योजनांकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत.

विशेषतः नोकरी करणारे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील नागरिक भविष्यासाठी सुरक्षित निधी तयार करण्यासाठी सुरक्षित बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. यातील अनेकजण पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेत गुंतवणूक करत आहेत.
दरम्यान आता पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. भारत सरकारद्वारे समर्थित असणाऱ्या या योजनेंतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. म्हणूनच तुम्हालाही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.
कारण अनेक लोक आपल्या मुलांचे शिक्षण, घर खरेदी, लग्न किंवा निवृत्ती यांसारख्या मोठ्या वित्तीय उद्दिष्टांसाठी आरडीचा पर्याय वापरत आहेत. पोस्ट ऑफिस आरडीची एक मोठी वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी कोणत्याही मोठ्या रकमेची आवश्यकता नसते.
केवळ 100 रुपयाची मासिक रक्कम जमा करून खाते उघडता येते. नंतर इच्छेनुसार हप्ता वाढवता येतो, ज्यामुळे गुंतवणूक शिस्तबद्ध पद्धतीने वाढत राहते. ज्या लोकांना एक रकमी गुंतवणूक करता येणे अशक्य आहे अशांसाठी ही योजना फायद्याची ठरते.
यामध्ये दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवता येते आणि यावर चांगले व्याज मिळते. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 6.7% वार्षिक व्याजदर उपलब्ध आहे आणि त्यावर तिमाही चक्रवाढ व्याज लागू होते.
चक्रवाढीचा परिणाम म्हणून कमी रक्कम देखील वेळेनुसार मोठा निधी तयार करते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दरमहा 20 हजार रुपये जमा करत असेल, तर 5 वर्षांत एकूण गुंतवणूक 12,00,000 होते.
यावर व्याज व चक्रवाढीचा लाभ मिळून मॅच्युरिटीच्या वेळी निधी सुमारे 14,28,727 पर्यंत पोहोचतो. म्हणजेच, केवळ पाच वर्षांत 2,28,727 रुपये इतक व्याज मिळू शकत. आरडी योजनेतील आणखी एक आकर्षक सुविधा म्हणजे कर्जाची सुविधा.
खातेधारकांना जमा झालेल्या रकमेवर कर्ज घेण्याची मुभा दिली जाते आणि यासाठी खाते बंद करावे लागत नाही. अचानक पैशांची गरज भासल्यास ही सुविधा मोठी मदत ठरते. करबचतीच्या दृष्टीनेही ही योजना उपयुक्त असून आयकर अधिनियम 80 सी अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळू शकतो.
खाते उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून पोस्ट ऑफिसमध्ये आधार, पॅन, दोन फोटो व 100 रुपये रक्कम जमा करावी लागते. ऑटो-डिपॉझिटची सुविधा उपलब्ध असल्याने बचत सतत चालू ठेवणे सुलभ होते. ही योजना कमी जोखीम, स्थिर परतावा आणि सरकारी संरक्षणामुळे पोस्ट ऑफिस आरडी गुंतवणुकीसाठी आज सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.













