Gold Price : 2024 हे वर्ष सोन्याच्या बाबतीत ऐतिहासिक ठरले आहे. कारण की यंदा इतिहासात पहिल्यांदाच एक तोळा सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे. सुरुवातीला एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर गेली होते आणि तेव्हापासून सोन तेजीतच आहे.
किमतीत वेळोवेळी चढ-उतार होत आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती एक लाख रुपयांच्या वर आहेत. सद्यस्थितीला एक तोळा सोने खरेदीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना एक लाख वीस हजार रुपये मोजावे लागतायेत.

या मौल्यवान धातूच्या किमतीत झालेले ही तुफान वाढ मात्र सर्वसामान्य ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशात दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आणि त्या काळातही सोन्याच्या किमती तेजीत होत्या.
दरम्यान, सध्या देशात लग्नसराईचा सीजन सुरू आहे आणि या दिवसांमध्ये नेहमीच सोन्याची मागणी वाढते, परिणामी किमतीतही वाढ होत असते. यंदाही तशीच स्थिती पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 3500 रुपयांची मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार काल 25 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3500 रुपयांनी वाढला.
काल एक तोळा सोने खरेदीसाठी ग्राहकांना एक लाख 28 हजार 900 रुपये मोजावे लागले. खरे तर शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस किमतीत सतत घसरण होत होती मात्र मंगळवारी अचानक किमतीत 3500 रुपयांची वाढ झाली.
नक्कीच या मौल्यवान धातूत आलेल्या तेजीचा गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. दरम्यान पुढील पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीत आणखी मोठी वाढ होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2030 पर्यंत सोने हे आणखी अधिक महाग होणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 25 वर्षांच्या काळात म्हणजेच 2000 ते 2025 या 25 वर्षांच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 14% वार्षिक परतावा मिळाला आहे.
या जवळपास अडीच दशकांच्या काळात 2013, 2015 आणि 2021 हे तीन वर्ष सोन्याचे रेट दबावात पाहायला मिळालेत. 2000 मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 4400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. मात्र 25 वर्षांमध्ये एक तोळा सोन्याची किंमत एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचली.
म्हणजेच सोन्याच्या रेटमध्ये साधारणता 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान पुढील पाच वर्षांच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्याची गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2030 मध्ये सोन्याची किंमत अडीच लाख रुपये प्रति तोळा होणार असा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला आहे. तर काही रिपोर्ट्स मध्ये सोन्याची किंमत 2030 मध्ये सात लाख ते साडेसात लाख रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकते असेही बोलले जात आहे.













