Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रातील सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला नुकतेच मंजुरी दिली असून या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नासिक अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे. दरम्यान मुंबई नाशिक लोकल सेवेचा प्रश्न आता निकाली निघण्याची शक्यता आहे. कारण की आता प्रत्यक्षात मुंबई ते नाशिक दरम्यान लोकल सेवा सुरू होणार आहे.

केंद्रातील सरकारने कसा राहते मनमाड यादरम्यान नवीन समांतर रेल्वे मार्ग विकसित करण्यास नुकतीच मंजुरी दिली असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई नाशिक दरम्यान लोकल सेवा सुरू होणार असल्याचा दावा केला जातोय.
या 131 km लांबीच्या समांतर रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रातील सरकारकडून नुकताच हिरवा कंदील मिळाला आहे आणि तेव्हापासूनच या नव्या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण 44 गावांमध्ये जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गावांमध्ये या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प नेमका कसा असेल याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा राहणार नवा प्रकल्प ?
मुंबई ते भुसावळ हा एक वरदळीचा मार्ग आहे आणि यावरील ताण कमी करण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने 131 किलोमीटर लांबीचा कसारा मनमाड समांतर रेल्वे मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
मंत्रालयाच्या मंजुरीमुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. नवीन रेल्वेमार्ग हा इगतपुरी, नाशिक, निफाड, चांदवड व नांदगाव या तालुक्यांतून जाणार अशी माहिती संबंधितांकडून मिळाली आहे. दरम्यान प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी शासनाने राजपत्रात नोंदणी केली आहे.
यामुळे आता या प्रकल्पासाठी लवकरच सविस्तर अधिसूचना घोषित केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे कसारा घाटात नव्याने दोन रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा जो प्राथमिक आराखडा समोर आला आहे त्यानुसार या नव्या प्रस्तावित मार्गावर एकूण 18 बोगदे राहणार आहेत.
कसारा घाटातील चढायची उंची सुद्धा कमी केले जाणार आहे आणि यामुळे कसारा घाटातून विनाबँकर रेल्वे सुद्धा धावणार आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा सुद्धा वेग वाढणार आहे आणि महत्त्वाची बाब अशी की लोकल सेवा सुद्धा सुरू होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे.
44 गावांमध्ये होणार भू-संपादन
इगतपुरी तालुक्यातील माणिक खांब, नांदगाव बु., बोरटेंभे, नांदूरवैद्य गावात जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवीत, भगूर ग्रामीण, भगूर (एमसीआय), संसरी, बेलतगव्हाण, विहितगाव, देवळाली, पंचक, एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, सिद्ध पिंप्री या गावांमध्ये जमिनीचे संपादन होईल.
निफाडमधील चितेगाव, नारायणगाव, चांदोरी, औणे, मौजे सुकेणे, कसबे-सुकेणे, पिंपळस, पिंपरी, निफाड, गीताकुंज, शिवडी, उगाव, थेटले, कोटमगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव (नि.) या गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे.
चांदवडमधील वाकी खु., वाहेगावसाळ, काळखोडे, तळेगाव रोही, रायपूर, वडगाव पंगू, रापली आणि नांदगावमधील मनमाड या गावांमध्ये पण लवकरच भूसंपादन होणार आहे. या नव्या रेल्वे मार्गावर चार स्टेशन विकसित होणार आहेत.
दरम्यान या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन तात्काळ सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहे. यासाठी अधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती सुरू झाली आहे. रेल्वेने शुल्क भरले की जमिनीची मोजणी सुद्धा सुरू होणार आहे.
फायदा काय होणार?
प्रस्तावित प्रकल्पामुळे भविष्यात मुंबई ते भुसावळ प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई – नाशिक लोकल सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कल्याण ते कसारा आणि मनमाड ते भुसावळ तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे.
दरम्यान आता कसारा ते मनमाड या रेल्वे मार्गाला समांतर असा मार्ग तयार होणार आहे. म्हणजेच हे तीन प्रकल्प पूर्ण झालेत की थेट मुंबई-भुसावळ दरम्यानचा प्रवास वेगवान होईल.













