PF Rules : पीएफ खातेधारकांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. तुमचेही जर पीएफ अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरे तर, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट ओपन केले जाते.
या अकाउंट मध्ये कर्मचाऱ्यांचा आणि कंपनीचा हिस्सा जमा केला जात असतो. कर्मचाऱ्यांना पीएफ अकाउंट मध्ये जमा पैसे रिटायरमेंट नंतर किंवा त्याआधी पण काढता येतात. पीएफ अकाउंट ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सांभाळते.

दरम्यान आज आपण ईपीएफओ मधून पैसे काढण्याचे नियम काय आहेत, पीएफ मधील पैसे काढल्यास कर भरावा लागतो का? अशा काही प्रश्नांची उत्तरे यातून समजून घेणार आहोत.
पीएफच्या पैशांवर कर लागतो का?
केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकालीन बचत योजना चालवते. निवृत्तीवेळी सुरक्षित निधी उपलब्ध व्हावा यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.
मात्र निवृत्तीपूर्वी बेरोजगारी, वैद्यकीय कारणे, लग्न किंवा घर बांधकाम यांसारख्या तातडीच्या गरजांसाठीही कर्मचारी या निधीतून पैसे आंशिक अथवा पूर्ण काढू शकतात. परंतु त्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू होतात. विशेष म्हणजे, वेळेपूर्वी पीएफ काढल्यास त्यावर कर (TDS) आकारला जाऊ शकतो.
पीएफ काढण्याचे नियम काय आहेत?
सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पीएफ मधील संपूर्ण रक्कम काढता येते. तसेच निवृत्तीपूर्वी सुद्धा पैसे काढण्याची मुभा आहे. निवृत्तीच्या 1 वर्ष आधी कर्मचारी 90% रक्कम काढू शकतात.
बेरोजगारीच्या काळात जसे की 1 महिन्यांच्या बेरोजगारीनंतर 75% रक्कम काढण्याची परवानगी मिळते व उर्वरित 25% नोकरी लागल्यानंतर नव्या पीएफ खात्यात आपोआप हस्तांतरित होते.
2 महिने बेरोजगार राहिल्यास पूर्ण रक्कम काढण्याची मुभा मिळते. PF चे पैसे ऑनलाईन काढता येतात. UAN–Aadhar लिंक असल्यास आणि नियोक्त्याची मान्यता मिळाल्यास ईपीएफ ऑनलाइन सहज काढता येतो.
पीएफ काढताना TDS का कापला जातो ?
सलग 5 वर्षांची सेवा पूर्ण होण्यापूर्वी पीएफ काढल्यास त्यावर TDS आकारला जातो. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम कपात झाल्याचे दिसते.
50,000 रुपये काढले तरी कर लागतो का?
5 वर्षांची सेवा पूर्ण झाली नसेल तरी 50,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम काढल्यास TDS लागू होत नाही. तसेच तुमची एकूण नोकरीची बेरीज (job-to-job service) 5 वर्षे झाली असेल, आणि तुम्ही जुनी रक्कम नवीन खात्यात हस्तांतरित केली असेल तर, काढलेली रक्कम टीडीएस मुक्त राहते.
पण 5 वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास नियम लागू राहत नाही आणि TDS कपात होऊ शकते. अनेकजण कपात झालेला TDS परत मिळू शकतो का? असा प्रश्न विचारतात. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की कपास झालेला टीडीएस परत मिळतो.
Form 26AS मध्ये TDS तपासून आयकर रिटर्न फाईल करताना कर्मचाऱ्यांना परताव्यासाठी दावा करता येतो. एकंदरीत, ईपीएफमधून पैसे काढणे सोयीचे असले तरी 5 वर्षांची सलग सेवा पूर्ण होण्याआधी पैसे काढल्यास काही प्रकरणांमध्ये कर भरावा लागू शकतो.
विशेषता पीएफ मधून जास्त पैसे काढणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. यामुळे वेळे आधीच पीएफ मधून पैसे काढायचे असल्यास त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला मोठा कर द्यावा लागणार आहे.













