Mahindra XEV 9S Price : तुम्हालाही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर, सध्या इलेक्ट्रिक वाहनांना देशात मोठी मागणी आहे. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देते.
सर्वसामान्य लोकही पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती दाखवत आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला नवीन 7 सीटर गाडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी महिंद्राने गुड न्यूज दिली आहे. आज Mahindra XEV 9S SUV लाँच झाली आहे.

ही कंपनीची पहिली सेव्हन सीटर इलेक्ट्रिक कार आहे. या गाडीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि आज अखेर ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे. अशा स्थितीत आज आपण या इलेक्ट्रिक एसयूव्ही गाडीचे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बाबत माहिती पाहणार आहोत.
कसे आहेत गाडीचे फिचर्स ?
महिंद्रा अँड महिंद्राने आज 27 नोव्हेंबर 2025 रोजी इंडियन कार मार्केटमध्ये आपली पहिली 7-सीटर इलेक्ट्रिक SUV XEV 9S लाँच केली आहे. हे कंपनीचे XEV 9e चे मोठे मॉडेल म्हणजे 7 सीटर व्हर्जन आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीची ही पहिलीच सेवन सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही कार आहे. महिंद्राने XEV 9S खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लाइफटाइम बॅटरी वॉरंटी देण्याचा सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे.
कारमध्ये 70 kWh बॅटरी पॅक असून ती 500 किमीपर्यंतची रेंज देते. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे ही SUV 20 ते 80% फक्त 20 मिनिटांत चार्ज होते. या इलेक्ट्रिक SUV मध्ये सनरूफ हा स्टॅंडर्ड फीचर असून सर्व व्हेरिएंटमध्ये तो उपलब्ध आहे.
ही SUV चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्यात Pack One, Pack Two, Pack Three आणि Pack Three Above यांचा समावेश आहे. दोन्ही 59 kWh आणि 79 kWh बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. XEV 9S ही INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असून ती 180 kW पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते.
0 ते 100 किमी वेग पकडण्यासाठी तिला फक्त 7 सेकंद लागतात आणि तिचा टॉप स्पीड 202 किमी प्रतितास आहे. तिसरी रांग फोल्ड केल्यास 527 लिटर बूट स्पेस, तर फ्रंकमध्ये 150 लिटर स्टोरेज मिळते.
कंपनीने दिलेल्या चार ड्रायव्हिंग मोडसमवेत या SUV मध्ये “PawPal Mode” देखील आहे. या मोडमुळे गाडीमध्ये पाळीव प्राण्यांना ठेवले असता AC आणि एअर फ्लो कायम राहतो. कारची रनिंग कॉस्ट 1.5 ते 1.8 रुपये प्रति किमी इतकी असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
नव्या SUV ची किंमत आणि बुकिंग डिटेल्स
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या नव्या SUV ची एक्स-शोरूम किंमत 19.95 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या 59 kWh व्हेरिएंटची किंमत 19.95 लाख तर 79 kWh व्हेरिएंटची किंमत 21.95 लाख रुपये आहे.
Pack 2 मध्ये 70 kWh (24.45 लाख रुपये) आणि 79 kWh (25.45 लाख ) असे दोन पर्याय मिळतात. Pack Three ची किंमत 27.35 लाख, तर Pack Three Above व्हेरिएंटची किंमत 29.45 लाख रुपये आहे.
या अलीकडेच लॉन्च झालेल्या बुकिंग बाबत बोलायचं झालं तर महिंद्राची XEV 9S ची बुकिंग 14 जानेवारीपासून, तर डिलिव्हरी 23 जानेवारीपासून सुरू होणार अशी खात्रीलायक माहिती देण्यात आली आहे.













