Rule Change : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक डिसेंबर 2025 पासून पाच महत्त्वाचे नियम बदलले जाणार आहेत. नोव्हेंबर महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या दोन दिवसांनी नोव्हेंबर महिन्याची सांगता होईल आणि नव्या डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान नव्या महिन्यात काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो.

अशा परिस्थितीत आता आपण या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नेमके कोणते आर्थिक बदल होतील आणि या बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका कसा प्रभाव पडेल? याचसंदर्भातील डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे नियम बदलणार
1) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे. नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवा युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना यापैकी कोणताही एक पर्याय सिलेक्ट करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्थात या मुदतीत सरकारी कर्मचाऱ्यांना एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे.
यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना या कामासाठी मुदत वाढ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच एक डिसेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांनी जो पर्याय सिलेक्ट केलेला असेल त्यानुसार त्यांना भविष्यात पेन्शन मिळणार आहे.
2) एलपीजी सिलेंडरचे दर बदलणार : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडर चे रेट फिक्स केले जातात. एक डिसेंबरला देखील एलपीजी गॅस सिलेंडर चे रेट बदलणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचे रेट बदललेले नाहीत.
मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत म्हणजेच 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत सतत बदल होतोय आणि पुढच्या महिन्यात देखील असाच बदल होण्याची शक्यता आहे.
3) CNG आणि PNG चे रेट पण बदलणार : पुढच्या महिन्यात सीएनजी चे आणि पीएनजी चे रेट सुद्धा बदलू शकतात. तेल कंपन्या प्रत्येक महिन्यात एलपीजीसह सीएनजी, पीएनजी आणि एटीएफचे नवे दर जाहीर करत असतात.
पुढील महिन्यात अर्थात 1 डिसेंबरला पण तेल कंपन्या एलपीजीसोबतच सीएनजी, पीएनजी आणि जेट फ्यूएलचे दर चेंज करतील अस सांगितल जातय. एटीएफला जेट फ्यूल म्हटलं जातं, ज्याचे देशांतर्गत दर आणि आतंरराष्ट्रीय दर हे नेहमीच वेगवेगळे असतात.
4) आधार कार्डबाबत मोठा बदल होणार : आधार कार्ड धारकांसाठी युआयडीएआयने नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमानुसार, आता मृत व्यक्तीचे आधार कार्ड रद्द केले जात आहे. आतापर्यंत दोन कोटी लोकांचे आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान पुढील डिसेंबर महिन्यात आणखी काही लोकांचे आधार कार्ड रद्द होणार आहे. म्हणजेच डिसेंबर महिन्यात परत एकदा मयत व्यक्तींचे आधार कार्ड रद्द होतील.
5) ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी हयात प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागेल. हे प्रमाणपत्र नोव्हेंबर महिन्यात जमा कराव लागत. दरम्यान 30 नोव्हेंबरपर्यंत हे सर्टिफिकेट जमा कराव लागणार आहे.
जर एखाद्यान लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर त्याची पेन्शन थांबू शकते. म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून ज्या लोकांनी लाईफ सर्टिफिकेट जमा केलेल नसेल त्यांना पेन्शन मिळणार नाही.













