Maharashtra IT Park : महाराष्ट्रातील दुसरे मोठे आणि भारतातील तिसरे मोठे आयटी पार्क सोलापूर जिल्ह्यात विकसित करण्यात येणार आहे. खरेतर सध्या सोलापूरच्या आयटी पार्क बाबत प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच आता आणखी एका आयटी पार्क बाबत चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर नंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या शहराला आयटी पार्क ची भेट होणार. सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातील चौथे मोठे आयटी पार्क विकसित होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

उद्योगविकासाचा वेग आणखी वाढवणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याचे सांस्कृतिक राजधानी पुणे जिल्ह्यात दोन आयटी पार्क विकसित झाले आहेत.
पुण्यातील हिंजवडी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आयटी पार्क आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आयटी पार्क तयार झालेले आहे. तसेच जिल्ह्यातील पुरंदर येथे पण आयटी पार्क विकसित करण्यात येणार आहे.
पुरंदर प्रमाणेच सोलापूरमध्ये ही आयटी पार्क प्रस्तावित करण्यात आले आहे. अशातच आता महाराष्ट्रातील चौथे मोठे IT पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचे खात्रीलायकवृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सातारा तालुक्यातील नागेवाडीत पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत 42 हेक्टर 87 आर इतक्या विस्तृत शासकीय जागेवर हे IT पार्क उभारले जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या संदर्भातील अधिकृत अधिसूचना देखील जारी झाली आहे.
राज्य शासनाच्या उद्योग विभागाने ही अधिसूचना काढली आहे. यामुळे साताऱ्यात आयटी पार्क उभारणीची प्रक्रिया आता अधिकृतपणे मोकळी झाली आहे आणि नजीकच्या भविष्यात येथे मोठे आयटी पार्क तयार होणार आहे.
हे आयटी पार्क महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आयटी पार्क राहील आणि यामुळे येथे हजारो नवयुवक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळणार आहे. हिंजवडी अन पुरंदरच्या धर्तीवर साताऱ्यात IT पार्क तयार होणार आहे.
हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी अन एकात्मिक विकासासाठी फारच महत्वाचा राहणार आहे. खरंतर साताऱ्यात आयटी पार्क व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सतत पाठपुरावा केला होता आणि त्यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला आहे.
त्यांच्या पुढाकारानेच एमआयडीसी मार्फत ठिकाणाची पाहणी तांत्रिक अहवाल आणि संपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री यांनी या प्रस्तावाला मान्यता देत साताऱ्यातील आयटी पार्क चा विषय निकाली काढला. साताऱ्यातील आयटी पार्कला शासनाकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने आता लवकरच येथे आयटी पार्क उभारणीला सुरुवात होणार आहे.
उद्योग विभागाने अधिसूचना जारी केल्यानंतर आता पुढील टप्प्यात जमीन हस्तांतरण, पायाभूत सुविधा उभारणी, आणि गुंतवणूकदार आकर्षण मोहिमा राबवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाचे पुढील टप्पे लवकरात लवकर राबवावे तसे निर्देश शासनाकडून मिळाले आहेत.













