Pune News : शाळा, कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांसाठी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. दोन डिसेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात दोन डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून यां दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेस तसेच शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्य निवडणूक आयोगाने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.

दोन आणि तीन डिसेंबर रोजी नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान याचं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दोन डिसेंबर रोजी जिल्ह्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पात्र मतदारांना मतदान करता यावे या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
या मतदारसंघात सुट्टी राहणार
ज्या ज्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतदार संघात 2 डिसेंबरला मतदान होणार आहे त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात मतदान होणार आहे.
या अनुषंगाने या संबंधित मतदारसंघात प्रशासनाच्या माध्यमातून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादी सरकारी आस्थापनांना या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
संबंधित मतदार संघातील शाळा कॉलेजेसला देखील या दिवशी सुट्टी राहील. यामुळे येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
नक्कीच पुणे जिल्ह्यात या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. यामुळे शासनाच्या सदर निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.













