शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! कमी दिवसात जास्त कमाई, ‘हे’ 3 स्टॉक ठरतील फायदेशीर

Published on -

Stock To Buy : शॉर्ट टर्म मध्ये चांगले रिटर्न हवे आहेत का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर गुंतवणूकदारांना नेहमीच तज्ञांकडून लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकाळात नक्कीच चांगले रिटर्न मिळतात. मात्र असे असले तरी काही स्टॉक असे आहेत जे की आपल्या गुंतवणूकदारांना शॉट मध्ये सुद्धा चांगला नफा मिळवून देतात.

दरम्यान, आज आपण टॉप ब्रोकरेजकडून सुचवण्यात आलेल्या टॉप 3 अशा शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत जे की अल्पकालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात.

हे शेअर कमी दिवसात मालामाल बनवणार 

एल्गी इक्विपमेंट : शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी Elgi Equipment चा स्टॉकं नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. या कंपनीबाबत बोलायचं झालं तर सदर कंपनी कंप्रेसर, पंप आणि डिझेल इंजिन बनवते.

दरम्यान या कंपनीच्या स्टॉकसाठी टॉप ब्रोकरेज मिराए ॲसेट शेअरखानने बाय रेटिंग दिली आहे. हा स्टॉक 516 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 546 ते 572 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

हा स्टॉक खरेदी करताना 494 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. महत्वाचे बाब म्हणजे मागील तीन महिन्यात या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना सहा टक्के रिटर्न मिळाले आहेत.

अरबिंदो फार्मा : हा स्टॉक शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. मागील तीन महिन्यात यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 19% रिटर्न मिळाले. दरम्यान पुन्हा एकदा ब्रोकरेचे फर्म रेलिगेअर ब्रोकिंगने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे.

हा स्टॉक 1229 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला मिळालाय आणि यासाठी 1320 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

परंतु हा स्टॉक खरेदी करताना 1190 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा असे सांगितले गेले आहे. नक्कीच अल्पकालावधीत चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर हा स्टॉक तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

वेस्टलाईफ फूडवर्ल्ड : तुम्हाला पण शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का मग तुमच्यासाठी हा स्टॉक फायद्याचा ठरू शकतो. ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबल यांनी Westlife Foodworld या शेअरसाठी ADD रेटींग दिली आहे. यासाठी 725 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

सध्या हा स्टॉक 566 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. म्हणजेच करंट मार्केट प्राइस पेक्षा हा स्टॉक 28% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अर्थात जे गुंतवणूकदार हा स्टॉक खरेदी करतील त्यांना यातून 28% पर्यंतचे रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News