Mutual Fund ने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! या 5 म्युच्युअल फंडांनी दिलेत 31% रिटर्न; 3 वर्षातचं पैसा झाला तीनपट

Published on -

Mutual Fund : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे लोकप्रिय प्रकार. अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे.

येत्या काळात ही गुंतवणूक आणखी मोठी होणार यात शंकाच नाही. दरम्यान जर आपणासही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख फायद्याचा ठरणार आहे.

खरे तर ज्या लोकांना शेअर मार्केटचे हर्षद ज्ञान नसते अशा लोकांसाठी पण म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट ठरतो. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळत आहेत. यात गुंतवणूकदारांना दोन पद्धतीने गुंतवणूक करत आहेत.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रो दर महिन्याला एक निश्चित तर रक्कम गुंतवता येते तसेच एकरकमी गुंतवणूक सुद्धा करता येते. मात्र म्युच्युअल फंड देखील जोखीम पूर्ण आहे यामुळे गुंतवणूक करण्याआधी योग्य अभ्यास आवश्यक आहे.

दरम्यान आज आपण मागील तीन वर्षात 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलेल्या टॉप पास म्युच्युअल फंड बाबत माहिती पाहणार आहोत. मागील तीन वर्षांच्या काळात Lumpsum म्हणजे एकरकमी गुंतवणुकीवर सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या टॉप पाच म्युच्युअल फंडबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

यामुळे तुम्हीही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेली असेल किंवा करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. परंतु मागील रिटर्नच्या आधारावर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही. यात गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी तज्ञ लोकांचा सल्ला घेणे तसेच योग्य अभ्यास करणे आवश्यक राहील.

तीन वर्षात सर्वाधिक रिटर्न देणारे म्युच्युअल फंड 

ॲक्सिस गोल्ड फंड : या यादीत हा म्युच्युअल फंड पाचव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांच्या काळात एकरकमी गुंतवणुकीवर या फंडाने 31.45% वार्षिक रिटर्न दिले आहेत. अर्थात तीन वर्षांपूर्वी या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे आजचे मूल्य 2.27 लाख रुपये झाले आहे.

क्वांटम गोल्ड सेव्हिंग्ज फंड : या यादीत हा फंड चौथ्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांच्या काळात एकरकमी गुंतवणुकीवर या फंडने 31.73% वार्षिक रिटर्न दिले आहेत. अर्थात तीन वर्षांपूर्वी या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे आजचे मूल्य 2.27 लाख रुपये झाले आहे.

एसबीआय गोल्ड फंड : या यादीत हा फंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांच्या काळात एकरकमी गुंतवणुकीवर या फंडने 31.73% वार्षिक रिटर्न दिले आहेत. अर्थात तीन वर्षांपूर्वी या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे आजचे मूल्य 2.27 लाख रुपये झाले आहे.

UTI गोल्ड ETF FoF : या यादीत हा फंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांच्या काळात एकरकमी गुंतवणुकीवर या फंडने 31.75% वार्षिक रिटर्न दिले आहेत. अर्थात तीन वर्षांपूर्वी या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे आजचे मूल्य 2.27 लाख रुपये झाले आहे.

मोतीलाल ओसवाल बीएसई एन्हांस्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड : या यादीत हा फंड पहिल्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांच्या काळात एकरकमी गुंतवणुकीवर या फंडने 31.78% वार्षिक रिटर्न दिले आहेत. अर्थात तीन वर्षांपूर्वी या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे आजचे मूल्य 2.43 लाख रुपये झाले आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News