बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी…! 30 नोव्हेंबरपर्यंत ‘हे’ काम केले नाही तर खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

Published on -

Bank Account News : नोव्हेंबर महिना बँक ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 30 नोव्हेंबर नंतर काही बँक ग्राहकांना आपल्याच अकाउंट मधून पैसे काढता येणार नाहीयेत. एवढेच नाही तर बँक ग्राहकांना खात्यात पैसे जमा करताना सुद्धा अडचण येऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) काही ग्राहकांना 30 नोव्हेंबरनंतर व्यवहारादरम्यान वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पीएनबी 30 नोव्हेंबर नंतर आपल्या काही ग्राहकांचे बँक अकाउंट निष्क्रिय करणार आहे.

पीएनबी ने आपल्या ग्राहकांसाठी केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक केली असून यासाठी 30 नोव्हेंबर ची मुदत देण्यात आली आहे. बँकेने केवायसी साठी वेळोवेळी आपल्या ग्राहकांकरिता मुदत वाढ दिली आहे पण 30 नोव्हेंबर ही ई-केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत असल्याचे बँकेकडून स्पष्ट केले आहे.

तसेच बँकेच्या सूचनेनुसार या तारखेपर्यंत केवायसी अपडेट न केलेल्या ग्राहकांचे बँक अकाउंट ‘निष्क्रिय’ होणार आहेत. अर्थात केवायसी केली नाही तरी बँकेत अकॉउंट तसच राहील पण खाते चालू असले तरीही ग्राहकांना पैसे काढणे, जमा करणे, ऑनलाईन पेमेंट किंवा इतर कोणतेही डिजिटल व्यवहार करता येणार नाहीत.

बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी तसेच ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व बँकांना वेळोवेळी ग्राहकांचे केवायसी रेकॉर्ड अपडेट ठेवणे बंधनकारक आहे.

यानुसार आता पीएनबीने देखील आपल्या ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची मुदत आहे. नियमानुसार, केवायसी अपडेट न केलेल्या खात्यांवर व्यवहार निर्बंध लावणे आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने पीएनबीने नोटीस काढली आहे. 

केवायसीसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

केवायसीची प्रक्रिया फारच सोपी आहे. यासाठी ग्राहकांना ओळखपत्र, पत्ता पुरावा, अलीकडील पासपोर्ट साइज फोटो, पॅन कार्ड किंवा फॉर्म 60, उत्पन्नाचा पुरावा आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक अशी कागदपत्रे द्यावी लागतात. दरम्यान पीएनबीने आपल्या ग्राहकांना केवायसी करण्यासाठी एक – दोन नाहीत तर चार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 

केवायसी करण्यासाठीचे चार पर्याय कोणते?

केवायसीचा पहिला आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे PNB ग्राहक थेट त्यांच्या जवळच्या शाखेत भेट देऊन केवायसी अपडेट करू शकतात.

याचा दुसरा पर्याय हा अँप्लिकेशनचा आहे. पीएनबी वन मोबाइल अॅपद्वारे किंवा इंटरनेट बँकिंग (आयबीएस) प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून घरबसल्या केवायसी करता येणे शक्य झाले आहे.

तिसरा पर्याय आहे ऑनलाइन बँकिंगचा. ही सर्वात सोपी आणि जलद प्रक्रिया असून, ग्राहकांना घरबसल्या केवायसी अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

केवायसी साठीचा चौथा पर्याय म्हणजे नोंदणीकृत ई-मेल आणि पोस्टाचा पर्याय. यासाठी ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल पत्ता किंवा पोस्टद्वारे आवश्यक कागदपत्रे होम ब्रँचकडे पाठवावी लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News