Banking News : एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. आरबीआयने या बँकेला सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवल आहे. मार्केट कॅपिटल नुसार एचडीएफसी ही एसबीआय पेक्षा मोठी बँक आहे.
दरम्यान याच एचडीएफसी बँकेला आता आरबीआयने मोठा दणका दिला आहे. खरे तर रिझर्व बँक ऑफ इंडिया वेळोवेळी देशभरातील सरकारी आणि खाजगी बँकांवर कारवाई करत असते.

काही बँकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, तर आरबीआय काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करते. दरम्यान आता आरबीआय ने एचडीएफसी बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे.
आरबीआयने एचडीएफसीला 91 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे एचडीएफसी च्या ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे तसेच आरबीआयच्या या कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम होणार हा सवाल उपस्थित होतोय.
खरे तर आरबीआय ने मागील काही दिवसांमध्ये देशभरातील अनेक सहकारी सरकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान आता बँकेने एचडीएफसी वर सुद्धा दंडात्मक कारवाई केली आहे.
एचडीएफसीला दंड ठोठावण्याचे कारण
देशाच्या मध्यवर्ती बँकेने एचडीएफसीवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई बँकिंग नियमन कायदा 1949 च्या नियमांच उल्लंघन झाल्यामुळे करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेकडून अॅडव्हान्सेसवरील व्याज दर,
वित्तीय सेवांचं आऊट सोर्सिंग आणि नो युवर कस्टमर यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन झाल्याचं आरबीआयच्या चौकशीत उघड झालं आणि यानुसार आरबीआयने आपल्या अधिकाराचा वापर करत बँकेवर दंडात्मक कारवाई केली. म्हणजेच आता एचडीएफसी बँकेला 91 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
आरबीआयच्या या दंडात्मक कारवाईमुळे एचडीएफसी च्या ग्राहकांमध्ये सध्या अस्वस्थता पाहायला मिळत आहे. परंतु आरबीआय ने घेतलेला हा निर्णय ग्राहकांवर कोणताच परिणाम करणार आहे.
यामुळे एचडीएफसी बँकेचे ग्राहक आणि बँक यांच्यातील व्यवहारावर कोणताच प्रभाव पडणार नाही. ग्राहकांचे व्यवहार तसेच सुरळीत सुरू राहणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे बँकेकडून वसूल केला जाणारा दंड हा बँक स्वतः भरणार आहे.
ग्राहकांकडून हा दंड वसूल केला जाणार नाही. यामुळे एचडीएफसीच्या ग्राहकांनी चिंता करू नये असे सांगितले जात आहे. या कारवाईनंतर सुद्धा एचडीएफसीचा व्यवहार आधी प्रमाणेच नियमित सुरू राहणार आहे.













