महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! जारी झाले महत्त्वाचे शासन परिपत्रक

Published on -

Maharashtra Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे सरकारी कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत सिंधुदुर्ग जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक परिपत्रक देण्यात आले आहे.

या परिपत्रकात शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्मान कार्ड 100% निर्माण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परिपत्रकातुन एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत.

त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत.

यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड Beneficiary Login मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

खरेतर दि. 16 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.

पण जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाजकल्याण कार्यालय इ. ठिकाणी शिबीरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांत सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचा-यांसह) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे 100 टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित कराव्यात.

अशा कर्मचा-यांसाठी Beneficiary लॉगीनद्वारे कार्ड निर्माणाकरीता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजीत करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल कार्यालयाला सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News