महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2, 5, 6 आणि 7 डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद राहणार, कारण काय?

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. खरे तर आजपासून डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि या नव्या महिन्याच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक खास बातमी समोर येत आहे.

या महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना चांगली मौजमजा करता येणार आहे कारण की पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना भरपूर सुट्ट्या मिळत आहेत. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना चार सुट्ट्या मिळणार आहेत. खरंतर शालेय विद्यार्थी सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.

दरम्यान, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन, पाच, सहा आणि सात डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय व सरकारी कार्यालय बंद राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. पण हे चार दिवस शाळा बंद का राहणार? या सुट्ट्यांचे कारण नेमके काय आहे याच बाबत आता आपण सविस्तर अपडेट पाहूया.

दोन डिसेंबर 2025 : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. या अनुषंगाने राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे आणि उद्या अर्थात दोन डिसेंबर रोजी नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. दरम्यान याच मतदानासाठी उद्या ज्या मतदारसंघात निवडणुका आहेत तेथील सरकारी कार्यालय शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार आहेत. 

5 डिसेंबर 2025 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निर्णयाच्या विरोधात अनेक राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासन अजून सर्वोच्च न्यायालयात गेलेले नाही.

यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी असून याच पार्श्वभूमीवर  05 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ मार्फत टीईटी परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात संप पुकारला आहे. या दिवशी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे.

सहा डिसेंबर 2025 : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी साजरा होईल आणि या अनुषंगाने मुंबई शहर व मुंबई उपनगरातील तमाम शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी मंजूर झालेली आहे. या दिवशी येथील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुद्धा सुट्टी राहणार आहे.

7 डिसेंबर : या दिवशी रविवार निमित्ताने सर्व शाळा बंद असतील. पाच अन सहा डिसेंबरला शाळेला सुट्टी राहणार आहे शिवाय 7 डिसेंबरला रविवार येतोय यामुळे एक मोठा लॉंग विकेंड विद्यार्थ्यांना मजा करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News