Maharashtra Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक वर्गासाठी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. ही अपडेट राज्यातील शिक्षकांसाठी तसेच होऊ घातलेल्या शिक्षकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर राज्य शासनाने नुकताच संच मान्यतेला तात्पुरती स्थगिती देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
यामुळे काही प्रमाणात शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अशी सगळी परिस्थिती असतानाच आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राज्यात पुढील काही वर्ष शिक्षक भरती होणार नसल्याचा दावा केला जातोय.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संचमान्यता पूर्ण झाली आहे. २०२५-२६ वर्षातील संचमान्यता अंतिम टप्प्यात आली आहे. संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन होईल.
यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यात पुढील पाच वर्ष तरी शिक्षक भरती होणार नसल्याचा दावा केला जात आहे. नक्कीच हे जर खर असेल तर शिक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता ही एक मोठी चिंताजनक बाब ठरू शकते.
दरम्यान समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर राज्यातील एकूण रिक्त पदे समजतील. आता आपण नेमके किती शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात याबाबतचा एक आढावा घेऊयात.
काय आहे संपूर्ण स्थिती
सद्यस्थितीला राज्यात एकूण १७,२६५ माध्यमिक शाळा आहेत ज्यामध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या १,७०,००० आहे. यात एकूण विद्यार्थी संख्या ९० लाख आहे. यानुसार या शाळांमध्ये ८,६०० शिक्षक अतिरिक्त होणार असा अंदाज आहे.
समायोजनाची प्रक्रिया अशी राहणार?
पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे सुरवातीला सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्याच जिल्ह्यात समायोजन होईल. त्यानंतर विभाग स्तरावर आणि शेवटी राज्यात कोठेही (ज्या शाळांमध्ये पदे रिक्त तेथे) समायोजन केले जाईल.
इयत्ता दहावी-बारावी बोर्ड परीक्षा व नववीपर्यंतच्या परीक्षा संपल्यावर म्हणजेच १ एप्रिल ते १५ जून २०२६ पूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईल, असे माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
किती वर्ष शिक्षक भरती होणार नाही ?
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तीन टक्के पदे रिक्त होत असतात. आता पटसंख्येचे नवे निकष व अतिरिक्त शिक्षकांची संख्या पहाता राज्यात आता किमान पाच वर्ष तरी शिक्षक भरतीचे कोणते चिन्ह दिसत नाहीत.
शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच असा दावा होत आहे. यामुळे आता पुढील शिक्षक भरती नेमकी कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.












