३२३ बोनस शेअर्सनंतर कंपनी आता गुंतवणूकदारांना देणार २४ मोफत शेअर्स !

Published on -

Bonus Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. ही बातमी बोनस शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरे तर शेअर मार्केट मधील कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर तसेच लाभांशाची भेट देतात.

दरम्यान या आठवड्यात पुन्हा एकदा शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. एफएमसीजी, मध आणि अन्न उत्पादने या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या एपिस इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्सची मोठी घोषणा केली आहे.

ह्या कंपनीने २४:१ बोनस शेअर वाटपाची मोठी घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याआधीही कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे वाटप केलेले आहे. दरम्यान कंपनीच्या या घोषणेनंतर याच्या स्टॉक मध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे.

खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे आणि आता बोनस शेअरची घोषणा झाल्यापासून या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत.

विशेष म्हणजे कंपनीने बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख सुद्धा फायनल केली आहे. कंपनीने बोनस शेअर्ससाठी ५ डिसेंबर २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. आता ही तारीख अगदी जवळ आल्यामुळे या शेअरची खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कंपनी नेमके किती बोनस शेअर्स देणार  

कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक १ शेअरसाठी २४ मोफत शेअर्स गुंतवणूकदारांना मिळणार आहेत. म्हणजेच, एखाद्या गुंतवणूकदाराकडे जर १०० शेअर्स असतील, तर बोनसअंतर्गत त्याला २४०० अतिरिक्त शेअर्स दिले जातील.

यापूर्वीही कंपनीने उत्कृष्ट बोनस इतिहास नोंदवला आहे. पहिल्यांदा कंपनीने ३२३ बोनस शेअर्स दिले होते, म्हणजेच १०० शेअर्सवर तब्बल ३२३ शेअर्स मोफत दिले गेले होते.

कंपनीची शेअर मार्केट मधील कामगिरी कशी आहे?

एपिस इंडिया लिमिटेडचा शेअर परफॉर्मन्सही तितकाच दमदार राहिला आहे. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी शेअरची किंमत २०.२५ रुपये होती, तर आज हा शेअर १०९७.९० रुपयांवर ट्रेड करत आहे.

म्हणजे फक्त तीन वर्षांत ५३२१% परतावा मिळाल्याने हा शेअर स्मॉलकॅप कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर ठरला आहे. तसेच, गेल्या २ वर्षांत १२३७% वाढ, एक वर्षात ३११% वाढ आणि फक्त एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत २९१% वाढ नोंदली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe