Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही येत्या काळात तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. तिरुपती बालाजी हे भारतातील एक प्रसिद्ध मंदिर.
येथे संपूर्ण जगभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रातून तिरुपती ला जाणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे. खरंतर तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातून गाड्या उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे रेल्वे प्रशासन भाविकांच्या सोयीसाठी वेळोवेळी विशेष गाड्या देखील चालवत असते. मध्यंतरी तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांची वाढलेली संख्या पाहता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विदर्भातील अमरावती ते तिरुपती बालाजी यादरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान आता याच विशेष गाडी बाबत रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीची मुदत संपत असतानाच आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती ते तिरुपती बालाजी यादरम्यान चालवली जाणारी स्पेशल ट्रेन आता 29 जानेवारी 2026 पर्यंत धावणार आहे. त्यामुळे जर तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तिरुपती दर्शनाचा प्लॅन बनवत असाल तर ही तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायी बातमी ठरणार आहे.
अमरावती – तिरुपती स्पेशल ट्रेनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच प्रशासनाच्या माध्यमातून या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
या निर्णयाचा अमरावती, अकोला, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांतील तिरुपती बालाजीच्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कसे आहे वेळापत्रक ?
अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा धावते. ही गाडी सोमवार आणि गुरुवार सकाळी 6.45 वाजता अमरावतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता तिरुपती स्थानकात पोहचते.
तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवली जाते. ही ट्रेन मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 3.45 वाजता तिरुपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी 3.10 वाजता अमरावतीला पोहोचते.













