FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी झाले आहे कारण की आरबीआयने रेपो रेट मध्ये जवळपास एक टक्क्यांची कपात केली आहे.
दरम्यान येत्या काळात फिक्स डिपॉझिट चे व्याजदर आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज आहे. कारण म्हणजे आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेट कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

महागाईचा दर नियंत्रणात असल्याने आता पुन्हा एकदा रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात येईल असा दावा तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
रेपो रेट मध्ये कपात झाल्यास बँकांकडून विविध कर्जांचे व्याजदर सुद्धा कमी केले जाणार आहे यामुळे सर्वसामान्य कर्जदारांना याचा मोठा दिलासा मिळेल.
पण या निर्णयामुळे बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर सुद्धा कमी होणार आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा निर्णय थोडासा धक्कादायक ठरू शकतो.
दरम्यान आज आपण अशा एका एफ डी योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळते.
आज आपण कॅनरा बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहूयात. या बँकेच्या एफडी योजनेत दोन लाखांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 80 हजार रुपयांपर्यंतचे व्याज मिळू शकते.
कोणती आहे ती योजना?
कॅनरा बँकेत ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीसाठी एफडी करता येते. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेकडून 3.25% पासून ते सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
बँकेकडून काही स्पेशल एफडी योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. कॅनरा बँकेच्या 444 दिवसांचे एफडी योजनेत ग्राहकांना कमाल 7.10 टक्क्यांपर्यंतच व्याज मिळते.
या स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.50% दराने व्याज दिले जाते. सिनिअर सिटीजन ग्राहकांना सात टक्के दराने व्याज दिले जाते आणि सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.10% दराने व्याज दिले जाते.
त्याचवेळी कॅनरा बँकेकडून पाच वर्षांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.25% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 6.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
अशा स्थितीत जर एखाद्या सामान्य ग्राहकाने कॅनरा बँकेच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्याला दोन लाख 72 हजार 708 रुपये मिळतात.
समजा सीनियर सिटीजन ग्राहकाने यात दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना दोन लाख 79 हजार 500 रुपये मिळतात. म्हणजेच सीनियर सिटीजन ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीवर पाच वर्षात जवळपास 80 हजाराचे व्याज मिळते.













