शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेवग्याच्या ‘या’ जातींची लागवड केल्यास मिळणार दर्जेदार उत्पादन

Published on -

Shevga Lagwad : शेवगा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. याची राज्यात अनेक ठिकाणी लागवड केली जाते. शेवग्याच्या शेंगा तसेच याचा पाला बाजारात विकला जातो. शेवग्याच्या शेंगांमध्ये जसेच्या पाण्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता बाजारात याचा मोठा खप पाहायला मिळतो.

शेवग्याच्या पाल्यापासून तयार होणारी पावडर ज्याला मोरिंगा पावडर म्हणून ओळखले जाते ती पावडर बाजारात मोठ्या चढ्या दराने विकली जाते. यामुळे शेवगा लागवड शेतकऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून फायद्याची ठरत आहे.

अलीकडील काही वर्षांमध्ये बाजारात शेवग्याची मागणी वाढत आहे आणि याचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होतोय. त्यामुळे अनेक जण शेवग्याची लागवड करत आहेत विशेषता ज्यांना फळबाग लागवडीत इंटरेस्ट आहे असे शेतकरी शेवगा लागवडमध्ये रस दाखवताना दिसतात.

दरम्यान जर तुम्हालाही शेवगा लागवड करायची असेल तर आजची बातमी खास ठरणार आहे. आजची ही बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अधिक लाभाची राहणार आहे.

कारण की, आज आपण महाराष्ट्रातील हवामानात तग धरून राहणाऱ्या आणि कमी पाण्यात जास्त कमाई मिळवून देणाऱ्या शेवग्याच्या काही जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत.

या जातीच्या लागवडीतून मिळणार प्रचंड नफा

कोकण रुचिरा : या जातीची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे महाराष्ट्रातील हवामानात तग धरून राहते. शेवग्याचा हा वाण विशेषता कोकण विभागासाठी शिफारशीत करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेला हा वाण कोकणातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे. या जातीच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून साधारणता 35 ते 40 शेंगा मिळतात.

भाग्या (के.डी.एम. 01) : शेवग्याची आणखी एक लोकप्रिय जात म्हणजे भाग्या. या जातीची लागवड कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात सुद्धा या जातीची जबरदस्त लागवड होत असून या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.

कर्नाटक राज्यातील बागलकोट कृषी विद्यापीठाद्वारे ही जात प्रसारित करण्यात आली आहे. ही जात बारा महिने उत्पादन देण्यास सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार लागवडीनंतर साधारणता चार ते पाच महिन्यांनी या जातीच्या पिकाला फळधारणा होते. या जातीची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे प्रति झाड 200 ते 250 शेंगा प्रतिवर्षी मिळतात.

जाफना : शेवग्याचा हा एक देशी वाण आहे आणि याची देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. या जातीला वर्षातून एकदाच फुले लागतात. फेब्रुवारी महिन्यात या जातीची फलधारणा सुरू होते. साधारणतः मार्च, एप्रिल आणि मे मध्ये शेतकऱ्यांना या जातीपासून उत्पादन मिळते. या जातीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना प्रति झाड 150 ते 200 शेंगा उत्पादन मिळू शकते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News