भारतातील ‘या’ बँका कधीही बुडणार नाहीत , स्वतः आरबीआयने सांगितली देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी

Published on -

Banking News : तुमचे पण बँकेत अकाउंट आहे ना मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकजण बँकेत ठेवलेला पैसा 100% सुरक्षित असतो अस समजतात. पण वास्तविक बँकेत ठेवलेला पैसा पूर्णता सुरक्षित नसतो.

जर बँक बुडाली तर ठेवीदारांचे पैसे सुद्धा मिळू शकतात. अशा स्थितीत देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक कोणती? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. दरम्यान याच बाबत आता रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर वाढत्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या शोधात आहेत. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अनिश्चितता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

अशातच गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय कडून देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर काही बँकांचा चक्क परवाना रद्द करण्यात आला आहे आणि यामुळे काही गुंतवणूकदारांचे पैसे सुद्धा बुडाले आहेत.

यामुळे अनेक जण सुरक्षित बँकांच्या शोधात आहेत आणि अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे. अशा स्थितीत आता आपण देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची माहिती जाणून घेऊया.

या आहेत भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका 

RBI ने अलीकडेच डोमेस्टिक सिस्टेमिकली इम्पॉर्टंट बँक्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत ज्या बँकांची नावे आहेत त्या बँकांना देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखले जाते. आरबीआय दरवर्षी अशा बँकांची यादी जाहीर करत असते.

आता पुन्हा एकदा आरबीआय ने ही यादी जाहीर केली असून यामध्ये दोन खाजगी आणि एका सरकारी बँकेचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँक या देशातील तीन प्रमुख बँका या यादीत सामील करण्यात आले आहेत.

या तीन बँकांना आरबीआयने ‘डोमेस्टिक सिस्टेमिकली इम्पॉर्टंट बँक्स’ (D-SIBs) म्हणून घोषित केले आहे. जाणकार लोक सांगतात की आरबीआयकडून ही जी यादी जाहीर केली जाते त्याला देशाच्या वित्तीय आरोग्याचा बारोमीटर मानले जाते.

या बँका इतक्या मोठ्या आणि व्यापक आर्थिक व्यवहारांशी निगडित असल्यामुळे त्यांचे अपयश संपूर्ण वित्तव्यवस्थेला मोठा धक्का देऊ शकते, असे RBI चे स्पष्ट मत आहे. हेच कारण आहे की या बँका सहसा बुडत नाहीत. D-SIB म्हणून घोषित झालेल्या ह्या बँका अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

लाखो कोटींच्या ठेवी, कर्जव्यवस्था, सरकारी व्यवहार, औद्योगिक वित्तपुरवठा ते डिजिटल बँकिंगच्या पायाभूत सुविधा या बँकांची उपस्थिती सर्वत्र जाणवते. त्यामुळे अशा बँकांची स्थिरता कायम राहणे अत्यावश्यक ठरते. RBI अशा बँकांवर सामान्य बँकांच्या तुलनेत अधिक भांडवली अट लादते.

म्हणजेच, संकटाच्या काळातही या बँकांकडे पुरेसे भांडवल राखीव असावे, जेणेकरून ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहील आणि बँकेच्या सेवा अखंडित सुरू राहतील. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एखादी बँक बुडाली तर त्यांचे किती पैसे सुरक्षित असतात.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की एखाद्या बँकेवर संकट आले किंवा ती बंद पडली तरी ठेवीदारांचे संरक्षण करण्यासाठी ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (DICGC) मार्फत प्रत्येकी 5 लाख रुपयांपर्यंतची हमी दिली जाते.

2020 पूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये होती, परंतु आर्थिक सुरक्षेचा विचार करून ती वाढवण्यात आली. याचा अर्थ, तुमच्या खात्यात सात लाख रुपये असतील तर बँक बुडाल्यानंतर तुम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळणार आहेत.

दहा लाख रुपये असतील तरीसुद्धा पाच लाख रुपये मिळणार आहे. त्याचवेळी जर तुमच्या खात्यात पाच लाख असतील तर तुम्हाला संपूर्ण पाच लाख रुपये मिळतील. तीन लाख रुपये असतील तर तुम्हाला पूर्ण तीन लाख रुपये मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News