Stock To Buy : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेअर मार्केट मधील चढ-उतार गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय असतानाच आता एका टॉप ब्रोकरेजने पुढील बारा महिन्यांच्या काळात काही शेअर्स गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतात असा अंदाज दिला आहे.

मिराए एसेट शेयरखान या टॉप ब्रोकरेज फर्मने लॉंग टर्म साठी पाच असे स्टॉक निवडले आहेत जे की गुंतवणूकदारांना मालामाल बनवण्याची क्षमता ठेवतात. दरम्यान आता आपण या ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 50% रिटर्न
REC : हा स्टॉक गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांच्या काळात 50 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 358 रुपये आहे मात्र यासाठी 535 रुपयांचे टार्गेट प्राईस सेट करण्यात आले आहे.
म्हणजेच येत्या बारा महिन्यात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 50% रिटर्न मिळतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे.
TCI : या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 1079 रुपये आहे मात्र येत्या काळात हा स्टॉक 1350 रुपयांपर्यंत वाढू शकतो. अर्थात पुढील बारा महिन्यांच्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 25% रिटर्न मिळतील असा अंदाज आहे. या शेअर साठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे.
KPIL : या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 1181 रुपये आहे. मात्र स्टॉक ची किंमत 1570 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच पुढील बारा महिन्यांमध्ये या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 33% रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. या अनुषंगाने हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Asian Paints : हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 2867 रुपये आहे. पण यासाठी 3360 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच एशियन पेंट चा स्टॉक येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 17% रिटर्न देणार अशी शक्यता आहे. ब्रोकरेजने या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिली आहे.
Ratnamani Metals and Tubes : हा स्टॉक पुढील बारा महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांना 22% रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो यामुळे या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग मिळाली आहे. याची करंट मार्केट प्राइस 2380 रुपये आहे. पण यासाठी 2900 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.













