Soybean Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. आता सोयाबीनचा बाजार हळूहळू तेजीत येत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मोठे समाधान आहे. सोयाबीन बाबत बोलायचं झालं तर हे पीक राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील एक महत्त्वाचे पीक आहे.
मध्य महाराष्ट्रात सुद्धा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि शेतकऱ्यांना या पिकातून चांगली कमाई सुद्धा होत आहे. मात्र गेले काही वर्षे सोयाबीन पिकासाठी निराशाचे राहिले आहेत.

या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची वास्तविकता आहे. एक तर सोयाबीन पिकाची एकरी उत्पादकता सातत्याने कमी होत आहे आणि दुसरे म्हणजे उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही.
मागील दोन वर्ष सोयाबीनला बाजारामध्ये अक्षरशा हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे आणि यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी झालेत. हेच कारण आहे की या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.
दुसरीकडे यंदा अतिवृष्टीचा देखील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय आणि यामुळे उत्पादनात प्रचंड घट येणार अशी शक्यता असतानाचा आता सोयाबीन बाजार तेजीत आला आहे. दरम्यान आज राज्यातील एका मोठ्या बाजारात सोयाबीनला 8200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : नागपूरच्या बाजारात आज सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाल्याची नोंद महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली.
आज नागपूरच्या एपीएमसी मध्ये लोकल सोयाबीनची आवक झाली होती आणि येथे सोयाबीनला किमान 8000 रुपये, कमाल 8200 आणि सरासरी 8150 रुपये असा रेट मिळाला.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात पिवळ्या सोयाबीनची 217 क्विंटल आवक झाली आणि येथे आज सोयाबीनला किमान चार हजार तीनशे रुपये, कमाल 4726 रुपये आणि सरासरी 4513 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
बाबुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज चौदाशे क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाल्याची नोंद करण्यात आली. या बाजारात सोयाबीनला किमान 3301, कमाल 4695 आणि सरासरी 4201 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात पिवळ्या सोयाबीनला किमान 3850, कमाल 4851 रुपये आणि सरासरी चार हजार 350 रुपये असा दर मिळाला आहे.
इतर बाजारात मिळाला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव
राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये आज सोयाबीनला समाधानकारक भाव मिळाला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कमाल साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास दर मिळाला आहे. आज सोयाबीनचा सरासरी बाजार भाव देखील 4,200 रुपये प्रति क्विंटल ते 4500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहिला आहे.













