शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईची सुवर्णसंधी ! ‘ही’ कंपनी देणार ५ फ्री शेअर्स, कंपनीत अजय देवगणची पण गुंतवणूक

Published on -

Bonus Share News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. एक बडी कंपनी गुंतवणूकदारांना 5 मोफत शेअर म्हणजे बोनस शेअर्स देणार आहे. या कंपनीत बॉलिवूडचे लोकप्रिय सुपरस्टार अजय देवगण यांची पण गुंतवणुक आहे. पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स देण्याची मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशन क्षेत्रात काम करते.

दरम्यान आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षक बोनस शेअर्स देणार आहे. यामुळे कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्या शेअर्स धारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने अलीकडेच ५:२ या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे प्रत्येक दोन शेअर्सवर गुंतवणूकदारांना पाच अतिरिक्त शेअर्स देण्यात येणार आहेत. यासाठी रेकॉर्ड तारीख पण जाहीर करण्यात आली आहे. बोनस शेअर्स वाटपासाठी ५ डिसेंबर २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या इतिहासात हा पहिलाच बोनस शेअर इश्यू असणार आहे.

यापूर्वी जुलै २०२४ मध्ये कंपनीने १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा एक शेअर पाच शेअर्समध्ये स्प्लिट केला होता, ज्यामुळे फेस व्हॅल्यू २ रुपयांवर आली होती. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत अजय देवगणकडे कंपनीतील १.४१% हिस्सा आहे. त्यांच्या नावावर एकूण १० लाख शेअर्स आहेत. गेल्या काही वर्षांतील प्रवास पाहिला तर पॅनोरमा स्टुडिओजचा शेअर गुंतवणूकदारांसाठी एक मल्टीबॅगर शेअर्स ठरला आहे. मागील सहा वर्षांत या शेअरने तब्बल ६०००% हून अधिक परतावा दिला आहे. मार्च २०१९ मध्ये हा शेअर केवळ २.७७ या दराने उपलब्ध होता. त्यानंतर सातत्याने वाढ होत ३ डिसेंबर २०२५ रोजी तो १७० वर बंद झाला. गेल्या पाच वर्षांतही या शेअरमध्ये सुमारे १७७६% वाढ झाली आहे.

मागील ५२ आठवड्यांत शेअरची हाय प्राईस २३८.८५, तर लो प्राईस १५२ इतकी राहिली आहे. आता बोनस शेअर्समुळे कंपनीची लिक्विडिटी वाढणार आहे आणि स्टॉकचा उपलब्धता स्तरही सुधारणार आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी या कंपनीत गुंतवणुकीचे आकर्षण आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अजय देवगणसारख्या सुपरस्टारचा या कंपनीत असलेला हिस्सा आणि कंपनीच्या व्यवसायातील सततची वाढ यामुळे या घोषणेकडे गुंतवणूकदारांकडून सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News