Zodiac Sign : आज सगळीकडे दत्त जयंतीचा सोहळा संपन्न होतोय. महाराष्ट्र कर्नाटक गुजरात सहित देशातील अनेक राज्यांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्तात्रेय जयंतीचा सोहळा साजरा केला जातो.
दरम्यान यंदा दत्त जयंतीला एक विशेष संगम होतोय. यावर्षी दत्त जयंती पासून काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. ज्योतिष तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आज दत्त जयंतीच्या दिवशी अर्थात चार डिसेंबर 2025 रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या राशीमध्ये आधीच गुरु ग्रहाची उपस्थिती आहे. अर्थातच या राशीत आज चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांची मोठी युती होणार आहे. गुरु आणि चंद्र या दोन ग्रहांच्या युतीमुळे शिव–गौरी शुभ योगाची निर्मिती झाली आहे.
चंद्र–गुरू युतीमुळे तयार होणारा हा योग समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा मानला जातोय. यामुळे आजपासून काही राशीच्या लोकांचा वाईट काळ दूर होणार आहे आणि नव्या सुवर्णकाळाला सुरुवात होईल अशी आशा आहे.
याच दिवशी अमृत सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचाही संयोग लाभदायी ठरणार असल्याने दत्त जयंतीचे महत्त्व अधिक वृद्धिंगत झाले आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, या दिवशी निर्माण होणारे हे शुभ योग तीन राशींच्या लोकांवर विशेष कृपा घेऊन येणार आहेत.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
वृषभ : प्रगतीचे नवे मार्ग उघडणार
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची दत्त जयंती अत्यंत भाग्यवर्धक ठरण्याचे संकेत आहेत. शिव–गौरी योगासोबत गजकेसरी योग सक्रिय होत असल्याने करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती दिसू शकते.
नोकरी किंवा व्यवसायातील अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे.
अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असून कौटुंबिक वातावरणात सौहार्द वाढेल. विवाहित जोडप्यांचे नाते अधिक दृढ होणार तर अविवाहितांसाठी चांगल्या प्रस्तावांची शक्यता आहे.
कन्या : आता या लोकांना खऱ्या अर्थाने आपल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. ह्या व्यक्तींसाठी हा दिवस अतिशय लाभदायी ठरणार आहे. गजकेसरी योगामुळे शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात सकारात्मक घडामोडी होतील.
विद्यार्थ्यांना शिक्षकांचा पाठिंबा मिळेल तर नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा अपेक्षित गौरव मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थितीत सुधारणा, बोनस किंवा पगारवाढीची चिन्हे स्पष्ट आहेत. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि व्यवसायात नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.
वृश्चिक : आर्थिक स्थैर्य आणि करिअरमध्ये उंच भरारी
वृश्चिक राशीसाठी दत्त जयंतीपासूनचा काळ शुभफलदायी मानला जातो. गजकेसरी योगामुळे व्यावसायिक आणि आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन करार, अपेक्षित नफा आणि करिअरमध्ये महत्त्वपूर्ण प्रगतीची शक्यता आहे.
घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आरोग्याशी संबंधित त्रास कमी होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलणार असून मानसिक–शारीरिक ऊर्जा वाढेल.













