भारतातील सर्वाधिक सुरक्षित खाजगी बँका कोणत्या ? आरबीआयची मोठी माहिती

Published on -

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया देशातील सर्व खाजगी, सहकारी आणि सरकारी बँकांवर नियंत्रण ठेवते. बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते, काही वेळा आरबीआय बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करते.

आरबीआय सहसा बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला गेल्यानंतरच बँकेचे लायसन्स रद्द घेण्याचा निर्णय घेत असते. गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर कारवाई केली आहे यात काही बँकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे तर काही बँकांचे चक्क लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या देशातील सर्वाधिक सुरक्षित खाजगी बँक कोणते असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरात आरबीआयच्या माध्यमातून पुढे आले आहे.

खरे तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडेच डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स अर्थातच D-SIBs ची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण तीन बँकांचा समावेश आहे. यातील दोन बँका खाजगी आहेत आणि एक बँक सरकारी आहे. आरबीआयने जी यादी जाहीर केली आहे त्याला सोप्या भाषेत देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी असे आपण म्हणू शकतो.

दरम्यान आरबीआयने जारी केलेल्या या यादीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजेच एचडीएफसी आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजेच आयसीआयसीआय बँक या तीन बँकांचा समावेश आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या यादीत समाविष्ट या बँका एवढ्या मोठ्या आहेत की त्या अयशस्वी होणे देशाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेसाठी धोकादायक ठरणारे असू शकते. या बँका टू बिग टू फेल या कॅटेगरीमध्ये येतात.

यामुळे आरबीआय या बँकांवर इतर बँकांपेक्षा अधिक लक्ष ठेवून असते. या बँकांचा देशाच्या जीडीपी मध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच भविष्यात जर या बँकांवर एखाद आर्थिक संकट आलं तर स्वतः भारत सरकार या बँकांना मदत करणार आहे.

थोडक्यात या बँकांचे कामकाज कधीच बंद होऊ शकत नाही असं आपण गृहीत धरू शकतो. यामुळे जर तुम्हीही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक निवडणार असाल तर तुम्ही या तीन बँकांपैकी कोणत्याही एका बँकेची निवड करू शकता.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया 2015 पासून सामील झाली आहे. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआय बँक, या यादीत 2016 पासून आणि एचडीएफसी बँक 2017 पासून सामील झाली आहे.

या यादीत सामील बँकांना नक्कीच भारत सरकारकडून एक सुरक्षा कवच उपलब्ध होते. सोबतच या बँकांवर अतिरिक्त जबाबदारी सुद्धा असते. या बँकांना इतर सामान्य बँकांच्या तुलनेत जास्त कॅपिटल ठेवावे लागते.

या बँकांमध्ये इतर बँकांच्या तुलनेत जास्त कॅपिटल असते आणि म्हणूनच या बँका कधीच तोट्यात जाऊ शकत नाहीत. हेच कारण आहे की या यादीत सामील बँकांना देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखलं जातं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News