Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की केलं काही दिवसांपासून राज्यात आणि देशात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सहा डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या दिवशी राजधानी मुंबईतील चैत्यभूमीवर अनुयायांची प्रचंड मोठी गर्दी होणार आहे. महापरिनिर्वाणदिनी दरवर्षी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी एकवटतात.
यावर्षी पण लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होणार अशी शक्यता आहे आणि आज पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाचा माध्यमातून आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून यंदाही विशेष प्रयत्न करण्यात आले असून, अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे पाहुयात.
कसे राहणार विशेष गाडीचे वेळापत्रक?
ही विशेष ट्रेन 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलबुर्गी येथून सोडली जाणार आहे आणि 6 डिसेंबरच्या सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी मुंबई येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी, विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सीएसएमटी येथून सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी 11:30 वाजता कलबुरगि स्थानकावर पोहोचणार आहे.
विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार
या विशेष गाड्यांना गाणगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर यांसह महत्त्वाच्या स्टेशनांवर थांबे असतील. गाड्यांची रचना देखील गर्दी लक्षात घेऊन भक्कम करण्यात आली आहे.
22 स्लीपर / सामान्य द्वितीय / सेकंड सीटिंग (अनारक्षित) कोच आणि 2 लगेज-कम-ब्रेक व्हॅन्स अशा मिळून 24 कोचेसचा समावेश असलेली ही गाडी मोठ्या प्रवासी संख्येला सामावून घेऊ शकेल.













