ब्रेकिंग : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार ! सातबारा कोरा होणार, स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितली तारीख

Published on -

Breaking News : राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीने आमचे सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते.

मात्र आता महायुतीचे सरकार येऊन बरेच दिवस झाले आहेत तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज माफी बाबत विचारणा होताना दिसत आहे. अखेर सरकार कर्जमाफी बाबत कधी घोषणा करणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.

दुसरीकडे राज्यातील शेतकरी बांधव विविध नैसर्गिक संकटांमुळे संकटात सापडले आहेत. अतिवृष्टी, महापूर नापिकी यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.

कांदा सोयाबीन तूर समवेतच विविध फळ पिकांचे दर कमी झाले आहेत. भाजीपाल्याला सुद्धा बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. या सगळ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून आता संसाराचा गाडा कसा चालवायचा हाच मोठा प्रश्न त्यांच्यापुढ्यात उभा राहिला आहे.

या अशा वेगवेगळ्या संकटांमुळे राज्यातील शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी उपस्थित होत आहे आणि यासाठी शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून मध्यंतरी राज्यव्यापी आंदोलन सुद्धा उभारण्यात आले होते.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून कर्जमाफी बाबत योग्य वेळी सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही दिली. यामुळे शेतकरी कर्जमाफी बाबत उभारण्यात आलेले हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. दरम्यान आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी शेतकरी कर्ज माफी बाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीच्या अनुषंगाने राज्यातील सहकार विभागाकडून जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली जात आहे.

खरे तर शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी सीएम फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने एका समितीची स्थापना केली होती. प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यास समितीची स्थापना झाली होती. सध्या ही अभ्यास समिती शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहे.

दरम्यान एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा अहवाल राज्य सरकार दरबारी सादर होण्याचे अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून हा अहवाल सरकार दरबारी जमा झाल्यानंतर लगेचच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

अर्थातच राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे संकेत मिळतं आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 जून पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सांगितले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मध्यंतरी 30 जून पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे विधान केले होते.

महत्वाची बाब म्हणजे यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी मिळाली होती.

त्यानंतर 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वातील सरकारकडून दोन लाखांची कर्जमाफी मिळाली होती. मात्र यावेळी शासन एक ऐतिहासिक निर्णय घेईल आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल असे म्हटले जात आहे.

अर्थात यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून सातबारा कोरा करून मिळणार आहे. नक्कीच जर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला तर त्यांना या अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे आणि नजीकच्या भविष्यात त्यांना शेतीमधून चांगली कमाई करता येणार आहे.

सद्य:स्थितीत राज्यातील जवळपास 25 लाख शेतकरी थकबाकीत आहेत. या संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांकडे 35 हजार 477 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती समोर आलीये. मात्र आता शासनाकडून या संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाणार असल्याचे समोर आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News