HSRP Number Plate : राज्यातील वाहनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि अगदीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की सरकारच्या माध्यमातून आता वाहनधारकांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
म्हणजे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना बसवलेल्या नंबर प्लेट आता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. जुन्या गाड्यांना सुद्धा नवीन हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

2019 पूर्वी नोंदणीकृत असणाऱ्या सर्व वाहनांसाठी हा नियम बंधनकारक आहे. खरे तर ही हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी आधी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्याचा निर्णय झाला होता.
मात्र या मुदतीत अनेकांनी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेली नाही आणि म्हणूनच आता सरकारने याला मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नवी प्लेट बसविण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडून देण्यात आलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. यामुळे 31 डिसेंबर नंतर मुदतवाढ मिळणे जवळपास अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, मागील 30 नोव्हेंबरची अंतिम तारीख लक्षात घेता अनेक वाहनधारकांनी अर्ज केला असला तरी प्रत्यक्ष प्लेट बसवण्याचे प्रमाण कमी असल्याने परिवहन विभागाने मुदतवाढ जाहीर केली आहे.
तसेच राज्य परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणतीही अतिरिक्त सवलत दिली जाणार नाही. नवीन प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, म्हणून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वाहनधारकांनी या मुदतीत नवी प्लेट बसवणे आवश्यक आहे.
अन्यथा 31 डिसेंबर 2025 नंतर वायुवेग पथकाकडून थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण जर ही नंबर प्लेट बसवली नाही तर किती दंड भरावा लागू शकतो याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.
किती दंड भरावा लागणार ?
प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, HSRP साठी अर्ज केलेला असेल परंतु वाहनावर प्लेट बसवलेली नसेल तर 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
मात्र, अर्जही केलेला नसेल आणि वाहनावर HSRP प्लेट बसवलेली नसेल, तर थेट 10 हजार रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत अर्ज करून प्लेट बसवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.













