Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लगीनघाईत लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. खरेतर नोव्हेंबर चा महिना उलटूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर चा हप्ता मिळालेला नाही.
गेल्या महिन्यात लाडक्या बहिणीने ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे मिळाले पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिला आपल्या हक्काच्या सन्माननिधीची प्रतीक्षा करत आहेत.

दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा न झाल्याने अनेक बहिणी थोड्या चिंतेत आहेत. पण आता नोव्हेंबर च्या हप्त्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. 2026 हे वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून मोठी भेट मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
माध्यमात यंदा डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे सोबतच मिळतील असा दावा केला जातोय. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये सोबतच लाडक्या बहिणींना दिले जातील आणि ही रक्कम नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाभार्थींच्या खात्यात वर्ग होणार असे सुद्धा म्हटले जात असे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेत तात्पुरता विलंब झाला आहे मात्र लवकरच या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. खरेतर, डिसेंबरची सुरुवात होऊनही नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने प्रश्न उपस्थित केले जात होते.
संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे निधी हस्तांतरणात विलंब झाला. यापूर्वीही गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांच्या खात्यात एकाचवेळी दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती, त्यावेळीही लाभार्थ्यांना 3 हजार रुपयांच डबल गिफ्ट सरकारकडून देण्यात आल होत.
त्यामुळे यंदाही तसाच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात थकबाकीतील नोव्हेंबरचा तसेच चालू डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
पण या वृत्ताला अजून सरकारकडून दूजोरा मिळालेला नाही. अद्याप राज्य सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तरीही आर्थिक वर्षाच्या नियोजनानुसार आणि निवडणूक आचारसंहितेनंतर निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणींना केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून अजूनही अनेक लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे बाकी राहिलेल्या लाडक्या बहिणीनी लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे. कारण की केवायसी केली नाही तर भविष्यात या योजनेचा लाभ थांबवला जाणार आहे. दरम्यान केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.













