मोठी बातमी ! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ आगारातून राजस्थान येथील खाटूश्यामसाठी नवीन बससेवा सुरु, कसा असणार रूट?

Published on -

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील श्याम प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर, राजस्थान येथील खाटू श्यामजी च्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातील भाविक खाटू नगरीत गर्दी करतात. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी दाखल होतात.

नाशिक सहित उत्तर महाराष्ट्रातूनही असंख्य लोक खाटूशामजीच्या दर्शनासाठी जात आहेत. दरम्यान जर तुमचाही खाटू श्यामजी दर्शनाला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

राजस्थान येथील खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी आतुर असणाऱ्या भाविकांकरिता एसटी महामंडळाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता शाम प्रेमींसाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा आगारातून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार ही विशेष बसेसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यामुळे सटाणा शहर, कसमादे पट्टा अर्थातच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळात तालुक्यातील भाविकांचा खाटू श्यामजीचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष बससेवेचा रूट कसा असणार याची माहिती पाहणार आहोत.

कसा असणार रूट ?

राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा आगारातर्फे सटाणा ते खाटू श्याम अशी बस सेवा सुरू केली जाणार आहे. आता आपण या विशेष बससेवेचा रूट कसा असणार याची माहिती पाहूयात. कारण की ही बस फक्त खाटूश्यामजी नाही तर या मार्गावरील अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवर पण जाणार आहे.

ही बस मध्यप्रदेश मधील मंदसौर येथील पशुपतिनाथ मंदिर, राजस्थान मधील मंडपिया येथील सावरिया सेठ मंदिर, चितोडगड, पुष्कर मधील देशातील एकमेव ब्रम्हा मंदिर, सालासर बालाजी, तेथून उज्जैन आणि मग पुन्हा सटाणा आगारात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे या विशेष बससेवेचे तिकीट दर फक्त 5605 रुपये प्रति प्रवासी असे ठरवण्यात आले आहे. दरम्यान जर तुम्हाला या विशेष बससेवेबाबत अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सटाणा आगाराशी संपर्क साधू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe