Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार असल्याच्या बातम्या तुम्ही मध्यंतरी वाचल्या असतील. मीडिया रिपोर्ट्स मध्ये देशातील पहिली वंदे भारत स्लीपर सर्वाधिक व्यस्त मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई – दिल्ली मार्गावर चालवली जाणार असल्याचा दावा केला जात होता.
मात्र आता या संदर्भात एक नवीन आणि अगदीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण की दिल्ली दरबाराने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर महाराष्ट्राला नाही तर बिहारला राजधानी दिल्लीसोबत कनेक्ट करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर पटना ते दिल्ली या दरम्यान सुरू होणार आहे. यामुळे बिहारहुन दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल असा विश्वास आहे.
परंतु यामुळे पुन्हा एकदा रेल्वे कडून महाराष्ट्राला डावलण्यात आले असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे आणि यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी सुद्धा आहे. सुरुवातीला ही गाडी मुंबई – दिल्ली मार्गावर सुरू होणार अशी प्रवाशांना अपेक्षा होते आणि यामुळे सारेजण उत्साही सुद्धा होते.
मुंबई – दिल्ली मार्गावर ही गाडी सुरू झाली असती तर नक्कीच याचा हजारो-लाखो प्रवाशांना फायदा झाला असता. दरम्यान, नजीकच्या भविष्यात राजधानी मुंबईला सुद्धा स्लीपर वंदे भारतची भेट मिळणार अशी अपेक्षा आहे.
केव्हा सुरू होणार पहिली स्लीपर?
दिल्ली ते पाटणा या मार्गावर डिसेंबर अखेरपर्यंत ही गाडी धावणार असल्याची शक्यता आहे. 12 डिसेंबर 2025 पर्यंत या गाडीचे संपूर्ण काम पूर्ण होईल आणि त्यानंतर चाचणी घेतली जाईल आणि चाचणीनंतर प्रत्यक्षात ही गाडी या मार्गावर धावेल असा अंदाज समोर आला आहे.
जानेवारी 2026 च्या आधी ही गाडी रुळावर येण्याची शक्यता आहे. या गाडीचा कमाल वेग हा 160 किलोमीटर प्रतितास असा आहे. गाडीत सर्व जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध राहतील. विमान प्रवासात जशा सुविधा असतात तशाच सुविधा या गाडीत रेल्वेने सुद्धा देण्याचा प्रयत्न होणार आहे.
या गाडीमुळे दिल्ली ते पटना हा प्रवास आठ तासात पूर्ण होणार आहे. सध्या जी वंदे भारत सुरू आहे त्यामध्ये झोपण्याची सुविधा नाही मात्र स्लीपर वंदे भारत मध्ये प्रवाशांना झोपून प्रवास करता येईल. या गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पोटातील पाणी सुद्धा हालणार नसल्याचा दावा होतो.
संभाव्य वेळापत्रक कस आहे ?
या गाडीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर पटनावरून सायंकाळी सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीत पोहोचणार आहे. ही गाडी आठवड्यातील सहा दिवस धावेल. या गाडीत 16 डब्बे असतील आणि जवळपास 830 प्रवाशांना प्रवास करता येईल.
राजधानीचे जेवढे तिकीट आहे तेवढेच तिकीट या गाडीचे सुद्धा राहू शकते. पण अजूनही या गाडीचे अधिकृत वेळापत्रक आणि तिकीट दर याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. यामुळे पटना – दिल्ली स्लीपर वंदे भारतचे टाईम टेबल आणि तिकीट रेट कसे असतात हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.













