स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! हर घर लखपती योजना सुरु, 591 रुपयांच्या गुंतवणूकीत मिळणार 100000 रुपये

Published on -

SBI New Scheme : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सोबतच अनेक जण सुरक्षित बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये तसेच एलआयसीच्या पॉलिसीज मध्ये अनेकांनी गुंतवणूक केली आहे.

याशिवाय बँकेच्या एफडी योजनांमध्ये आणि आरडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एसबीआयकडून एक गुड न्यूज समोर आली आहे.

सेवानिवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी तुम्हाला जर सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची हर घर लखपती योजना फायद्याची ठरू शकते.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक आणि कस्टमाइज्ड रिकरिंग डिपॉझिट योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे हर घर लखपती योजना असे ठेवण्यात आले आहे.

SBI हर घर लखपती योजनेअंतर्गत ग्राहकांना कमी रकमेपासून नियमित बचत करून भविष्यामध्ये एक लाख रुपयांचा निधी उभारण्याची संधी मिळते. या योजनेत ग्राहक आपल्या आर्थिक क्षमतेनुसार दर महिन्याला किती रक्कम जमा करायची हे स्वतः ठरवू शकतात.

तसेच गुंतवणुकीचा कालावधी देखील ग्राहकांच्या गरजेनुसार निवडता येतो. या योजनेचा कालावधी किमान 3 वर्षे ते कमाल 10 वर्षांपर्यंत ठेवण्यात आला आहे. या योजनेत सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलांच्या नावानेही खाते उघडता येते.

त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लहान वयातच बचत सुरू करू शकतात. हर घर लखपती योजनेत SBI कडून आकर्षक व्याजदर दिला जात आहे.

सध्या या योजनेत वार्षिक 6.50 टक्क्यांपासून 6.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला फक्त 591 रुपये गुंतवले, तर ठराविक कालावधीअखेर त्यांना 1 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो.

मात्र, या योजनेत सलग 6 हप्ते भरले नाहीत, तर खाते बंद होण्याची अट आहे. आजच्या घडीला अनेक गुंतवणूकदार कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असतात. अशा लोकांसाठी SBI ची हर घर लखपती योजना एक उत्तम संधी ठरते.

पगारातून किंवा नियमित उत्पन्नातून थोडीशी रक्कम बाजूला काढून गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. सुरक्षितता, विश्वासार्हता आणि चांगले व्याजदर यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी विशेष आकर्षक ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News