Maharashtra Best Picnic Spot : हिवाळा सुरू झाला की अनेकांचे पाय आपोआप थंड हवेच्या ठिकाणाकडे उकळतात. अनेकजण हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवतात आणि तुम्ही पण या हिवाळ्यात कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण विदर्भातील सर्वात सुंदर हिल स्टेशन बाबत माहिती पाहणार आहोत. तुम्हाला वन डे पिकनिकला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जोडीदारासमवेत किंवा कुटुंबासमवेत या थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला हवी.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भातील सर्वाधिक सुंदर हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते आणि येथे नेहमीच तुम्हाला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. विशेषतः हिवाळ्याच्या चार महिन्यांमध्ये येथे पर्यटकांची गर्दी वाढते कारण म्हणजे येथील निसर्ग.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये धुक्याची दाट चादर, हिरवेगार दाट जंगल यामुळे चिखलदऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वनडे पिकनिक साठी हे बेस्ट लोकेशन आहे म्हणून जर तुम्हाला पिकनिकला जायचे असेल तर तुम्ही तुमच्या यादीत या स्पॉटचा सुद्धा समावेश करायला हरकत नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे इथे गेल्यानंतर तुम्ही निराश होणार नाहीत, तुम्हाला इथे फिरण्यासारखे अनेक पॉईंट पाहायला मिळणार आहेत. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले हे हिल स्टेशन अमरावती जिल्ह्यात येतं. आता आपण चिखलदरा हिल स्टेशनवरील काही प्रमुख पर्यटन स्थळांबाबत माहिती पाहुयात.
भीमकुंड : चिखलदरा येथे स्थित असणारे हे ठिकाण पर्यटनासाठी तर ओळखले जातेचं याशिवाय या जागेला एक धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. या जागेचा संबंध थेट महाभारताशी जोडण्यात आला आहे. ही जागा थेट पांडवांपैकी एका पांडूपुत्राच्या वास्तव्याशी निगडित आहे.
असं म्हणतात की कुंतीपुत्र भिमाने राक्षसाचा वध केल्यानंतर या ठिकाणी येऊन स्नान केले होते आणि म्हणूनच या जागेला भीम कुंड या नावाने ओळखले जाते. या पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाला निळकुंड अशा नावाने पण ओळखले जाते.
मेळघाट वन्यजीव अभयारण्य : तुम्हालाही अभयारण्यात जाऊन वन्यजीव बघायचे असतील तर तुम्ही मेळघाटच्या यां अभयारण्याला जायलाच हवं. चिखलदरा पिकनिक साठी गेलात तर या अभयारण्याला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे पक्षी, प्राणी पाहायाला भेटतील. यासोबतच तुम्हाला इथे विविध प्रकारचे झाडे अन सुंदर निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे.
गाविलगड किल्ला : चिखलदऱ्यातील आणखी एक लोकप्रिय स्पॉट म्हणजे गाविलगड किल्ला. ज्या लोकांना ट्रेकिंगची विशेष आवड आहे अशा लोकांसाठी गाविलगड किल्ला बेस्ट ऑप्शन राहणार आहे. हा किल्ला फारच जुना आणि ऐतिहासिक आहे. त्यामुळे ज्या लोकांना ऐतिहासिक वास्तू पाहायला आवडत असतील त्यांनी येथे आवर्जून भेट द्यायला हवी.













