Pune Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन विभाग एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे ते नागपूर दरम्यान ही नवीन रेल्वे गाडी सुरू होणार असून या नव्या रेल्वे गाडीमुळे दोन्ही महानगरांमधील प्रवाशांना फायदा होणार आहे. हे गाडी अहिल्यानगर मार्गे धावणार असल्याने अहिल्या नगर जिल्ह्यातील प्रवाशांना सुद्धा या गाडीचा फायदा होईल.

नगरकरांचा पुण्याकडील आणि नागपूरकडील प्रवास या निमित्ताने वेगवान होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने या मार्गावरविशेष साप्ताहिक गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोण कोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबतची डिटेल माहिती या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष गाडी 19 डिसेंबर पासून सुरू होईल आणि 2 जानेवारीपर्यंत धावणार आहे.. या कालावधीत ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून प्रत्येक शुक्रवारी रात्री 20:30 वाजता सोडली जाणार आहे. पुण्यातून सुटल्यानंतर ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 14:05 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
यामुळे पुणे ते नागपूर व्हाया अहिल्यानगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी नागपूर पुणे – साप्ताहिक विशेष गाडी 20 डिसेंबर ते 03 जानेवारी 2026 या कालावधीत चालवली जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही गाडी दर शनिवारी सायंकाळी 16.00 वाजता नागपूर स्थानकातून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे बारा वाजता ही गाडी पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. आता आपण या गाडीचे अधिकृत थांबे कोणते आहेत याची माहिती पाहणार आहोत.
साप्ताहिक विशेष गाडीचे अधिकृत थांबे
सांस्कृतिक राजधानी आणि उपराजधानी यांना जोडणारी साप्ताहिक विशेष गाडी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार अशी माहिती प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली. ही गाडी अहिल्यानगर स्थानकावर सुद्धा थांबणार आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील नगर, बेलापूर, कोपरगाव या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा या स्थानकांवर ही गाडी थांबा घेणार असे बोलले जात आहे.













