Pandharpur Tirupati Railway : विठुरायांच्या भक्तांसाठी तसेच तिरुपती बालाजी येथील श्री वेंकटेश्वर स्वामीच्या भाविकांसाठी गुड न्यूज समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पंढरपूर ते तिरुपती दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे.
पंढरपूर–तिरुपती दरम्यान सुरू होणारी रेल्वेगाडी लातूर व्हाया चालवण्यात येणार आहे. ही एक साप्ताहिक रेल्वेगाडी राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या तीन दिवसात ही गाडी सुरू होणार आहे. 13 डिसेंबर 2025 पासून ही बहुप्रतिक्षित सेवा सुरू होत आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ही विशेष गाडी सुरू केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ते आंध्र प्रदेशातील तिरुपती दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू होणार असल्याने भाविकांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार असून या गाडीला भाविक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दाखवतील अशी आशा आहे.
खरेतर, पंढरपूर ते तिरुपती दरम्यान थेट रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांच्या माध्यमातून केली जात होती. खरे तर ऑक्टोबर महिन्यात रेल्वे सल्लागार समितीची एक महत्वपूर्ण बैठक झाली होती ज्यामध्ये या गाडीची गरज अधोरेखित करण्यात आली आणि ही गाडी लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी सुद्धा उपस्थित झाली.
लातूर मार्गे पंढरपूर–तिरुपती रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी अनेकांनी जोरदार पाठपुरावा केला आणि अखेर कार हा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. 13 डिसेंबर पासून आता पंढरपूर ते थेट तिरुपती दरम्यान रेल्वे सेवा सुरू होणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेसचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
तिरुपती – पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी 13 डिसेंबर पासून सुरू होईल आणि 28 डिसेंबर पर्यंत चालवली जाईल. तिरुपती – पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी 13 डिसेंबर पासून प्रत्येक शनिवारी सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांनी तिरुपती रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि ही गाडी लातूर मार्गे 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पंढरपूर स्थानकात दाखल होणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात प्रत्येक रविवारी आठ वाजता ही गाडी पंढरपूर येथून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री साडेदहा वाजता तिरुपतीला पोहोचणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढे सुद्धा या गाडीच्या फेऱ्या वाढवल्या जातील अशी माहिती समोर येत आहे. यामुळे या गाडीला भाविकांनी चांगला प्रतिसाद दाखवणे आवश्यक आहे.













